Header AD

महावितरणने केला उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांचा पुरस्काराने गौरव 

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  महावितरणचे कोकण प्रादेशिक विभाग कार्यालय तसेच कल्याण परिमंडल कार्यालय याठिकाणी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कोकण प्रादेशिक विभाग कार्यालयात प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांच्या हस्ते ध्वजारोहण कारण्यात आले. तर कल्याण परिमंडल कार्यालयात मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. याप्रसंगी मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.ध्वजवंदन कार्यक्रमानंतर कल्याण मंडल एक आणि दोन कार्यालयांतर्गत उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले. वर्षभर चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कारकिर्दीत एकदाच हा पुरस्कार कामगार दिनाच्या दिवशी देण्यात येतो. कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधामुळे गतवर्षीपासून स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी या पुरस्काराचे वितरण होत आहे.पुरस्कार वितरण कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक रेशमे म्हणालेप्रत्यक्ष फिल्डवर काम करणारे जनमित्र हे ग्राहकांसाठी महावितरणचा चेहरा आहेत. जनमित्रांनी अखंडित वीजपुरवठावितरित झालेल्या प्रत्येक युनिट विजेची वसुलीसुरक्षा साधनांचा वापरपारदर्शक व वेळेवर सेवा या पंचसूत्रीचा उपयोग करावा. सध्या महावितरणची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे चालू व थकीत वीजबिल वसुलीला गती देण्याचे आवाहन त्यांनी केले. मुख्य अभियंता धंनजय औंढेकरदिनेश अग्रवालसहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर यांनी सूत्रसंचालन केले. अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तावाडे व दीपक पाटील यांच्यासह अधिकारीअभियंते व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त कर्मचारी - राजेंद्र चौधरीमंगेश अहिरेमहेंद्र अडकेमिलिंद वाघमारेमुरलीधर बहिरामभीमराव तायडेविश्वास मुकणेभगीरथ चव्हाणशनिदास हजारीबाबासाहेब अहिरेसविता काटेगणेश अहेरउखा बोरसेनंदू पाटीलदीपक भोईरसुरेंद्र भोईरराजू राठोडसुभाष गायकरज्ञानेश्वर गुडूपमंगेश लोभीमनोज राठोडरघुनाथ खंडागळेदेवीप्रसाद सिंगशिवाजी चव्हाणजयवंत सांबरेअनिल लगशेट्टी.

महावितरणने केला उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांचा पुरस्काराने गौरव महावितरणने केला उत्कृष्ट तांत्रिक  कर्मचाऱ्यांचा पुरस्काराने गौरव Reviewed by News1 Marathi on August 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads