डोंबिवली मधील मोठ्या गृहसंकुलात ७८ एसीची चोरी...५ आरोपी अटकेत ..

 
डोंबिवली ( शंकर जाधव ) नव्याने उभारलेल्या जात असलेल्या एका गृहसंकुलात लावल्या जाणाऱ्या ७८ एसी चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली.विशेष म्हणजे हे गृहसंकुल मानपाडा पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर आहे.याप्रकरणी पोलिसांनी  ५ चोरट्याना अटक केली आहे.           अटक आरोपीं कडून त्याच्याकडून २० एसी  ५,८८,०००/-रू किमतीचा मुददेमाल हस्तगत केला.तर  १५,०००००/- रूपये किमतीच्या गुन्हयात वापरेल्या दोन कार सुद्धा जप्त करण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या चोरट्यांनी फेरीवाला बनून वसईत रस्त्यावर उभे राहून एसी विकले होते. या पाचही जणांनी कमी वेळात जास्त पैसे कमाविण्याच्या नादात हा गुन्हा केल्याचे उघड झाले आहे.

Post a Comment

0 Comments