Header AD

वलीपीर रस्त्याच्या दुरवस्थे कडे आणि परिसरातील मूलभूत सुविधां कडे लक्ष देण्याची मागणी


■मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांचे आयुक्तांना पत्र...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण पश्चिमे तील वलीपीर रस्त्याच्या दुरवस्थेकडे आणि परिसरातील मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.राव साहेब गोविंद करसन चौक ते जुना जकात नाका (वलीपीर रोड) या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे. हा मुख्य रस्ता असूनही सतत या रस्त्यावर दुर्लक्ष झाले आहे. कल्याण मधील सर्वच प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटिकरण करण्यात आले परंतु या रस्त्याला त्यातून ही वगळण्यात आले. असे हेतुपुरस्सर करण्यात आले असल्याचा आरोप इरफान शेख यांनी केला आहे.याला कारणीभूत तत्कालीन प्रकल्प अधिकारी किंवा शहर अभियंता जबाबदार आहेत. या रस्त्याच्या नावाचा उल्लेख जर तत्कालीन केंद्र सरकार ला पाठवलेल्या डीपीआर मध्ये होता मग हा रस्ता काँक्रिट चा का झाला नाही ?याची चौकशी होणे ही गरजेचे आहे. हा संपूर्ण रस्ता मुस्लिम बहुल भागातून गेलेला असल्याने असे घडले का ?याचे कोणीही उत्तर देण्यास तयार नसल्याचे शेख यांचे म्हणणे आहे.या मुस्लिम बहुल भागात मूलभूत सुविधा ही उपलब्ध नाही. सगळीकडे कचरा, सांडपाणी वाहत असते. त्यामुळे एमएमआरडीएकडून येणाऱ्या निधीतुन तातडीने हा रस्ता काँक्रिटचा करण्यात यावा. तसेच इतर मुलभूत सुविधा पूरवाव्यात  अन्यथा मोठे जन आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे महाराष्ट्र राज्य सचिव इरफान शेख यांनी पालिका आयुक्तांना दिला आहे.

वलीपीर रस्त्याच्या दुरवस्थे कडे आणि परिसरातील मूलभूत सुविधां कडे लक्ष देण्याची मागणी वलीपीर रस्त्याच्या दुरवस्थे कडे आणि परिसरातील मूलभूत सुविधां कडे लक्ष देण्याची मागणी Reviewed by News1 Marathi on August 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads