मोबाईल चोराला पाठलाग करुन महिलेने पकडलं

 कल्याण , कुणाल  म्हात्रे  : झटापटीत महिलेचा मोबाईल हिसकावून पळणाऱ्या आरोपीला कल्याण जीआरपीने अटक केली आहे. विशेष म्हणजे या महिलेनेच नागरिकांच्या मदतीने आरोपीला पकडून कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले होते. मात्र महिलेचा मोबाईल अद्याप सापडलेला नाही. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.मुंबईत काम करणारी एक महिला काही कामानिमित्त शहाड येथे आली होती. ती शहाड रेल्वे स्थानकात थांबली होती. याच वेळी एक तरुण तिच्याजवळ आला. त्याने या महिलेच्या हातातील मोबाईल खेचण्याचा प्रयत्न केलायावेळी महिलेने प्रतिकार केला मात्र तिला हिसका देऊन मोबाईल हिसकावून चोरट्याने पळ काढला. या झटापटीत महिलेचे काही दागिने गायब झाले. 
महिलेने पाठलाग करत चोराला पकडले. याच दरम्यान एक पोलीस कर्मचारी आणि काही नागरिक त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी या चोरट्याला पकडले. शाहरुख गफूर शेख या चोरट्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 14 ऑगस्ट रोजी घडली असून अद्याप मोबाईल आणि दागिने सापडलेले नाहीत.

Post a Comment

0 Comments