लहान मुलीच्या हातीतील मोबाईल पाहून प्रवाशाची फिरली नियत कामासाठी मुंबईत आलेल्या तरुणाची जेलमध्ये रवानगी
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : ट्रेनमध्ये लहान मुलीच्या हातात मोबाईल बघितला आणि प्रवाशाची नियत फिरली. मोबाईल हिसकावून प्रवासी तरुण घरी गेला. मात्र सीसीटीव्हीने या प्रवाशाचे बिंग फोडले. अखेर आदर्श कुमार नावाच्या तरुणाला अवघ्या पाच तासात कल्याण जीआरपीने  अटक करुन त्याच्याकडून चोरलेला मोबाईल हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे हा तरुण कामासाठी पहिल्यांदा मुंबईला आला. चोरी केल्याने त्याची रवानगी जेलमध्ये झाली आहे.रविवारी साडे आठ वाजताच्या सुमारास बिहारहून पवन एक्सप्रेस कल्याणला आली. ट्रेनच्या एका बोगीत शबनम खातून ही महिला तिच्या दोन लहान मुलींसोबत प्रवास करीत होती. कल्याण रेल्वे स्थानकात गाडी थांबली होती. शबनम ही तिच्या सिटवर झोपेत होती. तिचा मोबाईल तिच्या लहान मुलीच्या हाती होती. शबनमही झोपूतून जागी झाली तेव्हा तिचा मोबाईल तिच्या मुलीच्या हाती नव्हता. गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचली होती. शबनमही पुन्हा चोरीस गेलेल्या मोबाईलची तक्रार देण्यासाठी कल्याणला आली. कल्याण जीआरपीचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शादरुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरु केला.            शबनमचा चोरीस गेलेला मोबाईल सुरु होता. इतकेच नाही तर शबनमसोबत गाडी प्रवास करणारा एक प्रवाशाने हा मोबाईल हिसकावल्याचे पोलिसांना संशय होता. पोलिसांनी स्थानकातील सीसीटीव्हीच्या सहाय्याने प्रवाशाला शोधून काढले. सीसीटीव्ही फूटेजमधील प्रवाशाचे हावभाव पाहून त्यानेच मोबाईल चोरला असेल. कारण तो प्रवासी सातत्याने मागे पाहत होता. कल्याण जीआरपीचे पोलिस निरिक्षक पंढरी कांदे यांचे म्हणणे आहे की,कल्याण रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रीक पद्धतीने तपास सुरु केला.

           ज्या प्रवाशावर पोलिसांचा संशय होता. संशयित प्रवासाचे नाव आदर्श कुमार असल्याने पोलिसांनी शबनमच्या मोबाईलवर फोन केला तेव्हा फोन सुरुच होता. अखेर पोलिसांनी आदर्श कुमारला तळोजाहून ताब्यात घेतले. त्याच्याकडून त्याने चोरलेला मोबाईल हस्तगत केला आहे. आदर्श हा बिहारचा समस्तीपूरचा राहणारा आहे. तो कामानिमित्त प्रथमच मुंबईला आला होता. मोबाईल पाहून त्याची नियत फिरली असून त्याची रवानगी आता जेलमध्ये करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments