Header AD

खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना ठाणे, मीरा भाईंदर व नवी मुंबई कडून मदतीचा हात...
ठाणे, प्रतिनिधी : - महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे अनेकांची घरे उध्वस्त झाली होती. नुकताच महाड व चिपळूण गावांना मदत पोहोचल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील वाई, मेढा, सातारा, पाटण, सांगली, शिरोळ, कोल्हापूर या ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच गावा गावांशी जोडणारे रस्ते खचल्याने काही गावांचा संपर्क तुटला होता.              त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी मदत पोहोचत नव्हती यासाठी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातील १७ गावातील नागरिकांना जीवनावश्यक लागणारे अन्नधान्य, गृहोपयोगी भांडी, शेगडी, टोप, कुकर, ताट, वाटी, ग्लास, ब्लॅंकेट, चादरी, रजई यांचेही वाटप करण्यात आले. त्यावेळी नवी मुंबई जिल्हाप्रमुख श्री. विठ्ठल मोरे, श्री. द्वारकानाथ भोईर, मीरा भाईंदर जिल्हाप्रमुख श्री.प्रभाकर म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, शहर प्रमुख श्री. विजय माने, लक्ष्मण जंगम, नगरसेवक एम. के. मढवी, परशुराम म्हात्रे, नगरसेविका नंदिनी विचारे, माजी नगरसेवक मंदार विचारे, महिला जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, सौ. स्नेहल कंसारीया  उपजिल्हा संघटक मिरा भाईंदर तेजस्वी पाटील, युवासेना अध्यक्ष ठाणे नितीन लांडगे, किरण जाधव, धोंडू मोरे, राजू मोरे, राजू शिंदे, योगेश  सावंत, अमित मेढेकर,  रिया म्हात्रे, धनश्री विचारे, उपशहर संघटक मिरा भाईंदर त्याचबरोबर शिवसेना उपनेते तसेच सातारा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख नितीन बानगुडे पाटील, जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे, उप जिल्हा प्रमुख सचिन मोहिते, तालुका प्रमुख अनिल गुजर, प्रशांत शेळके, तानाजी चव्हाण, शहर प्रमुख निलेश मोरे, सातारा, सांगली, मिरज, पाटण येथील सर्व शिवसेना पदाधिकारी यांनी सहकार्य केले.


मदत पोहचविण्यात आलेली गावे              सातारा जिल्ह्यातील सज्जनगड, पांगारे, बोंडारवाडी, पळसावडे, मोरघर, दावण, जगमीन, सांडवली तसेच पाटण तालुक्यातील काटी, अवसरी, आंबेघर, बोरगेवाडी, ज्योतीबाची वाडी, कोरिवळे, टोळेवाडी  सांगली जिल्ह्यातील पलूस तालुका, आमनापूर, व त्या जवळील  इतर गावांना मदत करून काही ठिकाणी साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करून मोफत औषध पुरवठा उपलब्ध करून दिला होता.           पाटण तालुक्यातील काटी हे उंच शिखरावर असल्याने त्या ठिकाणी मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा सुरू असल्याने रात्री उशिरा मदत त्यांना पोहचविण्यात यश आले आहे. देशाच्या ७५ व्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्य दिन निमित्त खासदार राजन विचारे पश्चिम महाराष्ट्रातील गावांना मदतीसाठी असल्याने ठाणे शहरात उपस्थित  न राहिल्याने कराड येथे ध्वजारोहन करून राष्ट्रध्वजाला वंदन केले व तसेच त्यानिमित्त तेथील लहान मुलांना शालेय वस्तूंचे वाटप व खाऊ वाटप करून स्वातंत्र्य दिन साजरा केला.


खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना ठाणे, मीरा भाईंदर व नवी मुंबई कडून मदतीचा हात... खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना ठाणे, मीरा भाईंदर व नवी मुंबई कडून मदतीचा हात... Reviewed by News1 Marathi on August 16, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads