Header AD

राष्ट्रपती शौर्यपदक मानकरी अग्निशमन दलाच्या ४ जवानांचा शिवसेनेने केला सन्मान
कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  राष्ट्रपती शौर्यपदकाचे मानकरी ठरलेल्या उल्हासनगर अग्निशमन दलाच्या ४ जवानांचा कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी शिवसेना शाखेत सहसंपर्क प्रमुख शरद पाटील यांच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी नगरसेवक निलेश शिंदे, उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे, महिला संघटक राधिका गुप्ते, रेखा पाटील, हेमंत चौधरी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.धोकादायक इमारतींची पडझड, पूरपरिस्थिती, भयानक आगी यात अडकणाऱ्या नागरिकांना जीव धोक्यात घालून बाहेर काढणाऱ्या उल्हासनगर पालिकेच्या अग्निशमन दलातील मुख्य अग्निशमन अधिकारी बाळासाहेब नेटके, उपमुख्य अग्निशमन अधिकारी पंकज पवार, अग्निशमन केंद्र संदीप आसेकर, सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी राजेद्र राजम या चार जवानांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर झाले आहे. संपूर्ण देशातून २५ जणांना हे पदक जाहीर झाले असून यामध्ये ८ जण हे महाराष्ट्रातील तर यातील ४ जण हे उल्हासनगर महानगरपालिकेतील कर्मचारी आहेत.यातील राजेंद्र राजम हे कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी येथील रहिवासी असल्याने शिवसेना कोळसेवाडी शाखेच्यावतीने या चारही राष्ट्रपती शौर्यपदक मानकरी अग्निशमन जवानांचा सहसंपर्क प्रमुख  शरद पाटील यांच्यावतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. या अग्निशमन दलातील जवानांनी आपल्या जीवाची पर्वा न करता विविध घटनांमध्ये नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. या बद्दल त्यांना राष्ट्रपती शौर्य पदक मिळाले असून हि अभिमानाची बाब आहे. यासाठी या चार जणांचा सन्मान करण्यात आला असल्याची माहिती शिवसेना सहसंपर्क प्रमुख शरद पाटील यांनी दिली.दरम्यान आमच्या कार्याची दखल घेत राष्टपती पदक मिळाले असून यानंतर अभिनंदनाचा वर्षाव होत असून शिवसेनेदेखील आमचा सन्मान केला याबद्दल आभार मानत असल्याची भावना या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.


राष्ट्रपती शौर्यपदक मानकरी अग्निशमन दलाच्या ४ जवानांचा शिवसेनेने केला सन्मान राष्ट्रपती शौर्यपदक मानकरी अग्निशमन दलाच्या ४ जवानांचा शिवसेनेने केला सन्मान Reviewed by News1 Marathi on August 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads