कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १४ आस्थापनां कडून ७० हजार दंड वसूल
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १४ आस्थापनांकडून  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने दोन दिवसांत ७० हजार दंड वसूल केला आहे.महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टिकोनातून कोरोना नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच  दिलेल्या निर्देशानुसार गेल्या दोन दिवसात महापालिकेच्या विविध प्रभागातील प्रभागक्षेत्र अधिकारी व त्यांच्या पथकांनी आपल्या प्रभागातील मंगल कार्यालये/आस्थापना/मॉल / हॉटेल इ.  ठिकाणी पाहणी केलीपाहणी अंती १४ आस्थापनांकडून ७० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.    त्याच प्रमाणे आय प्रभागक्षेत्रात प्रभागक्षेत्र अधिकारी दिपक शिंदे यांनी मलंग रोड व शीळफाटा रोड या परिसरातील ७ दुकाने कोविड नियमांचे उल्लंघन केल्यामुळे सील केली.  तसेच ई प्रभागक्षेत्रात प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मालवण किनारा हे हॉटेल सील करण्याची कारवाई केली. 

Post a Comment

0 Comments