कल्याण तालुक्यातील अंगणवाडी सेविकांची मोबाईल वापसी १९९ अंगणवाडी सेविकांनी केले शासनाला मोबाईल परत
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण तालुक्यातील १९९ अंगणवाडी सेविकांनी आज शासनाचे मोबाईल परत केले आहेत. कल्याण ग्रामीण मध्ये ८ बिट असून खडवली २३गोवेली २४जांभूळ ३०आजदे एक आणि दोन मधून एकूण ५३निळजे एक आणि दोन मधून एकूण ४४ आणि वेहले मधून २५ अंगणवाडी सेविकांनी मोबाईल परत केले आहेत.२०१९ साली अंगणवाडी सेविकांना शासनाकडून मोबाईल वाटप करण्यात आले होते. या मोबाईलची वॉरंटी दोन वर्षे होती आणि मे २०२१ मध्ये त्याचा कालावधी संपला आहे. हा मोबाईल २-जीबी रॅमचा आहे. मोबाईलमध्ये लाभार्थींची नावेहजेरी, वजनउंचीस्तनदा व गर्भवती मातांची माहिती, पोषण आहाराचे वाटप इ. सविस्तर माहिती भरण्यात येते.मोबाईलची क्षमता कमी असल्यामुळे व त्यांत भरायची माहिती जास्त असल्यामुळे हे मोबाईल हँग व गरम होतात व त्या मोबाईलवर काम करणे कठिण होते. हे मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून मोबाईल जुना झाल्यामुळे सतत नादुरुस्त होतो. त्याच्या दुरुस्तीसाठी ३ ते ८ हजार खर्च होत असून अंगणवाडी सेविकांना तो खर्च आता परवडत नाही. तसेच केंद्र शासनाने अंगणवाडी सेविकांना पोषण ट्रॅकर अ‍ॅप दिले आहे ते इंग्रजी भाषेत असल्यामुळे माहिती भरताना अडचण होत असल्याने आज कल्याण तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी मोबाईल परत केले आहेत.दरम्यान आम्हाला दिलेले जे २०१९ साली मोबाईल दिले आहेत ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यामध्ये काम करणं आम्हाला कठीण होत आहे. मोबाईलची रॅम कमी असल्याने माहिती अपलोड होत नाही आणि त्याचा खर्च खूप आहे. आमच्या तुटपुंज्या मानधनातून त्याचा खर्च करू शकत नाही. म्हणून हे आम्ही निकृष्ट दर्जाचे मोबाईल परत करत आहोत. त्याच प्रमाणे पोषण ट्रेकर अ‍ॅप आहे तो पूर्णता इंग्रजी मध्ये आहे तो मराठी मधून करून घ्यावा या दोन मागण्यांसाठी हे मोबाईल आम्ही परत करत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ प्रकल्प प्रमुख कल्याण ग्रामीण संध्या जाधव यांनी दिली.


Post a Comment

0 Comments