Header AD

डोंबिवली भाजपा महिला आघाडीचे ठाकुर्ली उड्डाण पुलावरील खड्डे भरो आंदोलन
डोंबिवली शंकर जाधव ) कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रात रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा जीव जाईल का अशी भीती व्यक्त केली आहे. 
              डोंबिवली पूर्व-पश्चिम शहराला जोडणारा एकमेव ठाकुर्ली उड्डाण पुलावर खड्डे पडले आहेत. मंगळवारी खड्डेमय उड्डाणपूलाकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपा डोंबिवली पूर्व मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा पूनम पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोशी उड्डाणपुलावर खड्डेभरो आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले.


 

 

    भाजपा डोंबिवली पूर्व मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा पूनम पाटील,माजी नगरसेविका खुशबू चौधरीअमृता जोशीमनीषा छल्लारेवर्षा परमारहेमलता संतचित्रा माने, सायली सावंतधरती गडावंदना आठवले आदी महिला आंदोलनात सहभागी झाले होत्या.या आंदोलनात भाजपा महिलांनी रस्तावर पडलेल्या खड्ड्यात माती-विटांची भरणी करून ते खड्डे बुजविले.महिलांनी स्वतः भरलेली मातीची घमेली-फावडे घेऊन खड्डे भरले. 

        सामान्य नागरिकांना खड्ड्यांमुळे त्रास होऊ नये ही भूमिका या आंदोलनामागे होती.यावेळी पुनम पाटील म्हणाल्याशहरभर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.पालिका प्रशासन झोपी गेले असून त्यांना रस्त्यांकडे बघायला वेळ नाही.

       रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी निधी मंजूर झाला होता त्याचे पुढे काय झाले. रस्त्यांची दुरवस्था का होते याची माहिती पालकमंत्र्यांनी घेतली पाहिजे. खड्डेमय रस्त्यांमुळे अपघात होऊन नागरिक जखमी होत आहेत.रस्त्यातील खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत होऊन वाहतूक कोंडी होत आहे. 
       आयुक्तांनी याची दखल घेऊन खड्डेमुक्त रस्ते करावे. फक्त सणवार आले की रस्त्यांची डागडुजी करून रस्त्याला मलमपट्टी लावू नये टीका केली.तर ज्येष्ठ महिला कार्यकर्त्या वंदना आठवले म्हणल्या, या खड्ड्यांमध्ये पडून वाहनचालक जखमी झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाने घ्यावी असे यावेळी सांगितले.
      विशेष म्हणजे कधी नव्हे ते वाहतूक पोलीस आंदोलनाच्या वेळी वाहतूक कोंडी होऊ नये आले होते.तर सामान्य नागरिकांनी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला आमचा पांठिबा असून या पुलावरील खड्डे कधी बुजतील असा प्रश्न उपस्थित केला.

डोंबिवली भाजपा महिला आघाडीचे ठाकुर्ली उड्डाण पुलावरील खड्डे भरो आंदोलन डोंबिवली भाजपा महिला आघाडीचे ठाकुर्ली उड्डाण पुलावरील खड्डे भरो आंदोलन Reviewed by News1 Marathi on August 03, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads