Header AD

सम्राट अशोक विद्यालयात वृद्धाश्रमातील जेष्ट नागरिकाच्या हस्ते ध्वजारोहण

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयात भारताच्या 75व्या स्वातंत्र्यदिनी वृद्धाश्रमातील 75 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचलित सम्राट अशोक प्राथ.माध्य. विद्यालयसेंट वाय. सी.  स्कूलसम्राट अशोक इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने 75 वा स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या प्रांगणात मुंबई मीरारोडच्या श्री नित्यानंद आश्रमातील 75 वर्षाचे राजेश शहा80 वर्षाचे  मुरली धरण तसेच त्यांच्यासोबत आलेल्या नित्यानंद आश्रमाच्या  विश्वस्त सीमा काळे उपस्थित होत्या. तिरंगी ध्वजास एम.सी. सी. च्या विद्यार्थ्यांनी संचलन करून सलामी दिली.या समयी उपस्थितांना संबोधीत करतांना राजेश शहा यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्याना सांगितले की माझा मुलगामुलगी,व सून यांचे अपघाती निधन झाले. मी निराधार झालो त्यांच्या निधनामुळे मला दुर्दैवाने नित्यानंद आश्रमात यावे लागले. आश्रमाचे अध्यक्ष रुपेश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्याकडून माझी चांगली देखभाल होत असल्याने मी व माझ्या सोबत राहत असलेले इतर सर्व सदस्य आनंदात आहोत. मुलांनी आई बाबांची सेवा करावी. माझ्या हस्ते माझ्या आयुष्यात प्रथमच आपल्या देशाचा तिरंगी ध्वज फडकविण्याची संधी मला सम्राट अशोक विद्यालयाने दिली त्यामुळे मी धन्य झालो आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोलाचा आहे.कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष पी. टी. धनविजय, मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, सुजाता नलावडे  यांच्यासह इतर शिक्षक उपस्थित होते. गणेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन कार्यक्रमाचा आनंद घेतला.

सम्राट अशोक विद्यालयात वृद्धाश्रमातील जेष्ट नागरिकाच्या हस्ते ध्वजारोहण सम्राट अशोक विद्यालयात वृद्धाश्रमातील जेष्ट नागरिकाच्या हस्ते ध्वजारोहण Reviewed by News1 Marathi on August 15, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads