एशियन पेंट्स कडून ग्राहकांना चमकदार व आकर्षक इंटीरिअर वॉल्‍स देण्‍यासाठी रॉयल ग्लिट्झ लाँच


नवीन इंटीरिअर वॉल सर्वांचे लक्ष कशाप्रकारे वेधून घेऊ शकते हे दाखवणारी सर्वांगीण मीडिया मोहिम सादर...


■दीपिका पदुकोण असलेली नवीन टीव्‍हीसी एशियन पेंट्स रॉयल ग्लिट्झला प्रकाशझोतात आणते...


राष्‍ट्रीय, ऑगस्‍ट २०२१ :  चकाकणा-या सर्वच गोष्‍टी सोने नसतात, पण निश्चितच लक्ष वेधून घेतात. एशियन पेंट्स या भारताच्‍या सर्वात मोठ्या पेंट व डेकॉर कंपनीने नवीन लक्‍झरी पेंट ऑफरिंग रॉयल ग्लिट्झ लाँच केले आहे. हा लक्‍झरीअस इंटीरिअर वॉल पेंट निश्चितच तुमच्‍या घरातील आकर्षकतेमध्‍ये अधिक भर करेल. पेंटमधील लक्‍झरीसह टेफ्लॉन™ सरफेस प्रोटेक्‍टर भिंतींवरील डाग सहजपणे पुसले जाण्‍याची खात्री देते. नवीन रॉयल ग्लिट्झची अल्‍ट्रा-शीन तुमच्‍या घरातील भिंतींना आकर्षक व चमकदार फिनिश देईल, जे त्‍वरित सर्वांचे लक्ष वेधून घेईल आणि निश्चितच तुम्‍हाला #StealYourSpotlight अनुभव देईल.           आकर्षक व विलक्षण टेलिव्हिजन जाहिराती निर्माण करण्‍यासाठी ओळखले जाणा-या एशियन पेंट्सची रॉयल ग्लिट्झसाठी नवीन टीव्‍हीसी अपेक्षांची पूर्तता करते. या जाहिरातीमध्‍ये ब्रॅण्‍ड अॅम्‍बेसेडर दीपिका पदुकोण फॅशन-फोटो शूटसाठी आकर्षक पवित्रामध्‍ये उभ्‍या असलेल्या दिसतात. बॅकग्राऊण्‍डला क्‍लासिक गाणे 'बार बार देखो'चे आधुनिक व्‍हर्जन सुरू राहत ही जाहिरात दाखवते की, नवीन पेंटने दीपिका यांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि त्‍या खूपच अचंबित झाल्‍या आहेत.            दीपिका पदुकोण यांचे कौतुक न करता इतर गोष्‍टींचे कौतुक करणे फारशा लोकांना जमलेले नाही. पण घरामध्‍ये फोटो-शूट करताना हीच बाब घडलेली आहे. बॉलिवुड आयकॉन खूपच मोहक दिसत आहेत आणि अभिनेत्रीचे आकर्षक फोटो काढत असताना फोटोग्राफरचे लक्ष दुसरीकडे विचलित होते. त्‍याचे लक्ष दुसरीकडेच आहे आणि त्‍याबाबत विचारले असता प्रत्‍युत्तर ऐकून दीपिका स्‍तब्‍ध होतात. ते प्रत्‍युत्तर म्‍हणजे मागील बाजूस अल्‍ट्रा शीन - रॉयल ग्लिट्झसह पेंट करण्‍यात आलेल्‍या 'भिंतीने' तिचे स्‍पॉटलाइट कमी केले आहे.            या नवीन लाँचबाबत बोलताना एशियन पेंट्स लिमिटेडचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी अमित सिंगले म्‍हणाले, ''आज ग्राहक त्‍यांच्‍या घरगुती इंटीरिअर्ससाठी एक्‍स फॅक्‍टरचा शोध घेत आहेत. ज्‍यामुळे संस्‍मरणीय व वैशिष्‍ट्यपूर्ण प्रभाव निर्माण होणयसोबत घराची आकर्षकता व ग्‍लॅमर देखील वाढेल.           आम्‍ही नवीन एशियन पेंट्स रॉयल ग्लिट्झ इंटीरिअर लक्‍झरी पेंटसह आमच्‍या ग्राहकांना हाच अनुभव देत आहोत आणि टीव्‍हीसीच्‍या माध्‍यमातून ही बाब सादर करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. आम्‍हाला पुन्‍हा एकदा या टीव्‍हीसीसाठी दीपिकासोबत काम करण्‍याचा आनंद होत आहे. तिने यापूर्वी एशियन पेंट्ससोबत केलेल्‍या जाहिरातींपेक्षा या जाहिरातीची संकल्‍पना व सादरीकरण खूपच वेगळे आहे.''

Post a Comment

0 Comments