पूरग्रस्त भागात जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपातून करुणा वृक्षने जपली सामाजिक बांधिलकी
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : पूरग्रस्त भागात जीवनावश्यक वस्तूंच्या वाटपातून करुणा वृक्ष या सामाजिक संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे.  कोविड दुस-या लाटेची भयंकर परिस्थितीत, एकीकडे निराशामृत्यूबेरोजगारी,ताणताणाव यांना सामोरे जात असतानाच निसर्ग हि रुसला. महाराष्ट्रात विविध ठिकाणी आलेल्या पुरांमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा नागरिकांना मदत करण्यासाठी विविध संस्था पुढे सरसावल्या असून त्यामध्ये करुणा वृक्ष या संस्थेने देखील कोकणात धाव घेत येथील नागरिकांना मदत केली आहे.मध्यम वर्गातील काही जण "समाजासाठी काहीतरी करायचे आहे" असा दृष्टीकोनातून एकत्र आले व कामाला सुरवात झाली. कोणत्याही सामाजिक कामाचा अनुभव नसतानाही मोठ्या ध्येर्याने पुढे होऊन कामे सुरु करण्यात आली आहेत. सद्याची कोकण पूर परिस्थिती पाहता त्याही ठिकाणी संस्था मदतीसाठी सरसावली. चिपळूण येथे १०० धान्याचे कीट वाटप करून काही कुटुंबाना जगण्यासाठी हातभार लावला आहे.तर कल्याण पासून काही कि.मी. अंतरावर रायते आदिवासी पाडयात पुरामुळे लोकांचे हाल झाले आहेत हे समजताच संस्थेचे कार्यकते प्रिजू यांनी लगेच सहकार्य करण्यासाठी होकार कळवला.  अरुण, बिपीन, विनोद, यांच्या मदतीने ५६ आदिवासी कुटुंबाना धान्य कीट देण्यात आले. यामध्ये तांदूळ 2 किलोमीठ 1 किलोतेल 1 किलोसाखर 1 किलोगव्हाचे पीठ 2 किलोतुरडाळ 1 किलोमेणबत्ती पाकीटकपडे व अंगाचे प्रती ५ नग साबणटूथपेस्ट पेस्ट. चादर असे साहित्य होते. संस्थेच्या या कामामध्ये अनुबंध संस्थेचे कार्यकर्ते सूर्यकांत कोळी व इतर सहकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments