महाड़ व चिपळूणच्या मदतीला धावले मुंबईचे निरंकारी सेवादल


◆३४ सेवादल युनिटच्या १००३ सेवादल स्वयंसेवकांचा सहभाग...


कल्याण, कुणाल म्हात्रे  : कोंकण व पश्चिम महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या अतिवृषटीमुळे प्रचंड हाहाकार उडाला होताकोंकणातील चिपळूण आणि महाड शहरांना याचा मोठा फटका बसला होतादोन्ही ठिकाणी महापुराने वसाहती जलमय झाल्या होत्या व जनजीवन कोलमडून पडले होतेअशा आपत्कालीन परिस्थितीत नेहमी प्रमाणेच  'मानवाला मानव प्रिय असावाएकमेकांचा आधार बनावाया सद्गुरु वचनाला कृतीत उतरवत सुरवातीपासून संत निरंकारी सेवादलाच्या त्या त्या जिल्ह्यातील शेकडो स्वयंसेवकांनी आपले मानव सेवेचे ब्रीद जपत मदत कार्य केले.महापूर ओसरल्यानंतर घरेवस्त्या आणि रस्त्यांवर पसरलेले चिखलाचे आणि घाणीचे साम्राज्य हटवणे हे एक फार मोठे आव्हानात्मक काम होतेपरिस्थितीचे गांभीर्य ओळखून मंडळाच्या वतीने मुंबईतील सेवादल क्षेत्रीय संचालक ललित दळवी आणि संत निरंकारी मराठी मासिकाचे संपादक चंद्रकांत जाधव यांनी महाड येथे जावून मंडळाचे स्थानिक क्षेत्रीय प्रभारी प्रकाश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्त भागाचा दौरा केलामोठ्या प्रमाणावर सेवा कार्य असल्याचे पाहून मंडळाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार मुंबईहून सेवादल पाठविण्याचा निर्णय घेतला.दिनांक २९ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत टप्पा टप्प्याने हे सेवादल स्वयंसेवक महाड व चिपळूण येथे गेले आणि त्यांनी घरेवस्त्यासार्वजनिक ठिकाणे व रस्त्यांची साफसफाई केलीयामध्ये मुंबईनवी मुंबईउरण व ठाणे येथील निरंकारी मिशनच्या ३४ सेवादल युनिटमधील १००३ निरंकारी सेवादल सदस्यांनी आपले योगदान दिलेत्यामध्ये ५४ सेवादल अधिकाऱ्यांचा समावेश होतादिनांक ३०  जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत महाड येथे तर १ व २ ऑगस्ट रोजी चिपळूण येथे या स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणावर मदत कार्य केले.        खास करून महाड शहरामधील नवेनगर पूर्ण परिसर,मिलिटरी बोर्डिंगपंचशील नगरनगर परिषद शाळा क्र. 4, चवदार तळेआंबेडकर सभागृह-चवदार तळे, आंबेडकर स्मारक-शिवाजी चौक रमाई विहारतालुका कृषी कार्यालयडॉमपारा नर्सिंग होम परिसरके..एस.दगडू शेठ पार्टे इंग्लिश मिडीयम स्कुल,थरवळ कन्या शाळारोहिदास नगरप्राईड इंडिया परिसर,ट्रामा केअर हॉस्पिटल परिसरपरांजपे हायस्कूलशासकीय विद्यार्थी मुलांचे वसतिगृहजैन मंदिर,एसटी स्टँडकुंभारआळीकवेआळीमधलीआळीबिरवाडी आदी परिसर अडी भागांचा समावेश होतानवेनगरच्या सर्व परिसरात डीडीटी   पावडर फवारणीही केली गेली.  चिपळूण मध्ये तर शहरातून चालत जाण्याचीही सोय नव्हतीतेथील वस्त्यागल्ल्यारस्ते यावर साठलेला प्रचंड गाळ व चिखल सेवादलाने मोठ्या हिकमतीने हटवला आणि रस्ते मोकळे केलेविशेषतः भुरटे वस्ती परिसर स्वच्छ केला.  महाड व  चिपळूण येथील स्थानिक प्रशासन आणि अनेक मान्यवरांनी संत निरंकारी सेवादलाच्या या निष्काम भावनेचे आणि तन्मयतेने केलेल्या सेवेचे कौतुक केलेस्थानिक नागरिकांनी सेवादलाचे मनापासून आभार मानले.

Post a Comment

0 Comments