२७ गावातील पाणी प्रश्नावर खासदारांनी घेतली आयुक्तांची भेट


■जास्त दाबाने पाणी पुरवठा करण्याची एमआयडीसीकडे खासदारांची मागणी बैठकीला एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण - डोंबिवली मधील २७ गावांना एमआयडीसी कडून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने येथ पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत असून यावर तोडगा काढण्यासाठी काल कल्याण-डोंबिवली मनपा आयुक्तालयात डॉ. विजय सुर्यवंशी आणि एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एकत्रित बैठक आयोजित केली होती. या बैठकीस शहरप्रमुख राजेश मोरेमाजी नगरसेवक दीपेश म्हात्रेराजेश कदमतालुकाप्रमुख प्रकाश म्हात्रेएकनाथ पाटीलरवि म्हात्रेउमेश पाटीलगुरूनाथ लोटेप्रमिला पाटीलप्रेमा म्हात्रे आदी उपस्थित होते.
 एमआयडीसी कडून २७ गावांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. त्यामुळे या गावांत जास्त दाबाने पाणी पुरवठा सुरु करण्याची मागणी एमआयडीसी अधिकाऱ्यांकडे केली. सदर मागणी तात्काळ मान्य करत जास्त दाबाने पाणी पुरवठा करण्याचे एमआयडीसी अधिकाऱ्यांनी मान्य केले. नागरिकांना पुन्हा पुन्हा पाणी टंचाई जाणवू नये याकरिता पाण्याचा दाब नियमित ठेवण्याच्या सुचना खासदारांनी केल्या.

       २७ गावांत अमृत योजने अंतर्गत सुरु असलेल्या कामांचा वेग वाढवत लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. कोळेगाव ते एमआयडीसी या मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असून अधिक गती देऊन सदर काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. हि जलवाहिनी टाकण्याचे काम ३ महिन्यात पूर्ण होईलअशी ग्वाही एमआयडीसी अधिकाऱ्यांनी यावेळी बैठकीत दिली.

Post a Comment

0 Comments