ओबीसींचा इंपिरिकल डेटा मिळविण्या बाबत लववकरात लवकर कार्यवाही व्हावी.


राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंदराव निरगुडे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत केली मागणी


पुणे, प्रतिनिधी  :  राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत अगोदरच संपलेली आहे व काही स्थानिक स्वराज्यय संस्थांची मुदत नजीकच्या काळात संपत आहे. त्यामुळे ओबीसींचा इंपीरिकल डेटा लवकरात लवकर मिळवून द्यावा, जेणेकरून ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण पुर्नस्थापित करणेबाबत राज्य सरकारकडून कार्यवाही होईल.


     

            ओबीसी जनमोर्चातर्फे राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंदराव निरगुडे यांना एम्पिरिकल डेटा संबंधी निवेदन देऊन तपशीलवार चर्चा करण्यात आली. व अशा प्रकारचा अनुभवजन्य व सखोल (empirical) डेटा देण्यात यावा अशी आग्रही मागणी ओबीसी जनमोर्चाच्यावतीने आयोगाकडे करण्यात आली. अशी माहिती ओबीसी जनमोर्चाचे उपाध्यक्ष दशरथदादा पाटील यांनी दिली.         ओबीसींचा इंपीरिकल डेटा आणि ओबीसींच्या विविध प्रश्नाबाबत ओबीसी जनमोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्या. आनंदराव निरगुडे व आयोगाचे अन्य सदस्य यांच्या समवेत बुधवारी पुणे येथे पार पडली. या बैठकीत श्री. निरगुडे यांनी राज्यातील माहिती गोळा करण्यासाठी सर्व तालुक्यातून प्रत्येकी तीन ते चार प्रतिनिधी देऊन संघटनेने सहकार्य करावे, असे आवाहन केल्याचे पाटील यांनी सांगितले.         यावेळी ओबीसी जनमोर्चाचेवतीने आपल्या व सरकारी यंत्रणेमार्फत इंपरिकल डेटा लवकरात लवकर मिळविण्यात यावा. त्यासाठी तामिळनाडू, कर्नाटक सरकारने अवलंबलेली कार्यपद्धती अवंलबिण्यात यावी. तसेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाबरोबरच राज्यपातळीवर जातनिहाय जनगणना करण्यासाठी राज्यसरकारकडे पाठपुरावा करण्यात यावा.           त्याचबरोबर  आयोगाकडे प्रलंबीत असलेल्या प्रकरणांचा कालानुक्रमाने निपटारा करण्यात  यावा. व भविष्यात ही तसेच करण्यात यावे. प्रलंबिित असलेल्या प्रकरणातील संभाव्य ओबीसी जातींच्या ढोबळ माहितीचा इंपिरिकल डेटामध्ये विचार व्हावा. आणि सर्व स्थानिक संस्थांमध्ये ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली.          तर या बैठकीत न्या. आनंदराव निरगुडे  यांच्या नेतृत्वाखाली आयोगाकडून ओबीसी, भटके-विमुक्त, विशेष मागासवर्ग, बलुतेदार आदि समाज घटकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा ओबीसी जनमोर्चाचे वतीने करण्यात आली.         या बैठकीला ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, उपाध्यक्ष सर्वश्री जे. डी. तांडेल, दशरथ दादा पाटील, मृणाल ढोलेपाटील व सरचिटणीस सर्वश्री संदेश मयेकर, अरविंद डाफळे, दिगंबर लोहार, कृष्णा वणे, मंगेश ससाणे, समन्वयक माधव कांबळे आणि महादेव मेंगे, सुहास काशिद, हरिभाऊ घाणेकर, मंगेश हमणे, बजरंग गडदे, विठ्ठल चोपडे, धोंडीराम जावळे, गोविंद कोरवी आदि ओबीसी जनमोर्चाचे पदाधिकारी राज्यभरातून उपस्थित होते.

-----------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments