माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

 ठाणे , प्रतिनिधी  : ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली असून यापुढेही कारवाई सुरूच राहणार आहे.


      

        या कारवाईतंर्गत माजिवडा मानपाडा प्रभाग समिती मधील वाघबिळ गांव स्टील्ट + ५ मजली अनधिकृत इमारतवरील मालदा साफ करण्याचे काम सुरू आहे. भाईंदरपाडा येथील नाईट क्वीन (खुशी) या अनधिकृत लेडीज बारचे बांधकाम पूर्णपणे निष्कसित करण्यात आले.        ओवळा येथील स्टर्लिंग या अनधिकृत लेडीज बारचे बांधकाम पूर्णपणे निष्कसित करण्यात आले. तसेच ढोकळी येथील डिमार्ट च्या बाजूला चालू असलेले बैठी बांधकाम पूर्णपणे निष्कसित करण्यात आले.


         सदर निष्कासनाची कारवाई माजिवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त  कल्पिता पिंपळे आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या सहाय्याने करण्यात आली.Post a Comment

0 Comments