डोंबिवलीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची मागणी
डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली येथे  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे भव्यदिव्य स्मारक व्हावे अशी मागणी येथील मातंग समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. डोंबिवलीतील इंदिरा चौकात  लोकशाहिर अण्णा भाउ साठे यांची १०१ वी जयंती साजरी उत्साहात साजरी करण्यात आली.त्यावेळी हि मागणी करण्यात आली.           यावेळी माणिक उघडे, किशोर मगरे, राजू धुरदेव, दत्ता मळेकर, बालाजी शिंदे, अर्जुन भाबड, हे मान्यवर उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते अण्णा भाउ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन जयंतीचा कार्यक्रम सुरु करण्यात आला.


  
              तुकाराम भाउराव उर्फ अण्णाभाऊ साठे निरक्षर असूनही त्यांनी  कादंब-या,कथा, प्रवासवर्णन, नाटक, शाहिरीगीते, वगनाट्ये, गाणी त्यांनी लिहिली. फकिरा,  वारणेचा वाघ या कादंब-यांवरील चित्रपट गाजले.जातीच्या,  भाषेच्या  प्रांताच्या देशाच्या मर्यादा ओलांडून ते जागतिक किर्तीचे झाले. अश्या जागतिक साहित्यिकास भारतरत्न पुरस्कार द्यावा.            तसेच डोंबिवलीत साहित्यरत्न अण्णा भाउंचे भव्यदिव्य स्मारक व्हावे अशी मागणी करण्यात आली.जयंती समयी मातंग समाजातील भुजंग कांबळे, रेखा कांबळे, बंडु कांबळे, अरुण कांबळे, संजय गायकवाड, माया घोडे, रंजना शिर्के, यमुना दाढेल,  सचिन कांबळे, मनोज भोगे चंद्रकांत दिपक दाढेल, बाबू जाधव ,मिना दाढेल, अक्षय खंदारे, रंजना खंदारे, गुरु भडकवाड उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments