खड्ड्यातून गणपती कसे आणले जातात हे मुख्यमंत्र्यानी पाहावे


■संघर्ष समितीचा टोला टॅक्स बिलाची संघर्ष समितीने होळी करण्याचा इशारा....


डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण डोंबिवलीत गांवे समाविष्ट झाली असली तरी मूलभीत सुविधा दिल्या नाहीत. पाणी नाही, वीज नाही, रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. एकीकडे पाण्यासाठी नागरिक पालिकेवर मोर्चे काढत असतांना दुसरीकडे रस्त्यात जागोजागी खड्डे पडले आहेत. गणेशोत्सवात श्रीगणेशाचे आगमन करतांना खड्यामुळे विघ्न येईल की काय अशी भीती नागरिकांना आहे. त्यामुळे खड्ड्यातून गणपती कसे आणले जातात हे मुख्यमंत्र्यानी पाहावे अशी टीका संघर्ष समितीने बैठकीत केली. तसेच सुविधा न देता वाढीव मालमत्ता कर आकारत असल्याने त्या बिलाची होळी करू असा इशारा दिला.
            कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून २७ गावे वेगळी करून त्याची वेगळी नगरपालिका करा या मागणीवर सर्व पक्षीय हक्क संरक्षण समिती ठाम असून सरकारशी लढा देण्यास नेहमी तयार आहे. मानपाडा येथील मानपाडेश्वर मंदिरात समितीने २७ गावांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. यावेळी उपाध्यक्ष गुलाब वझे, चंद्रकांत पाटील, गजानन मांडगुळकर, वसंत पाटील, विजय भाने, रंगनाथ ठाकूर, रतन पाटील, मुकुंद म्हात्रे, सुखदेव म्हात्रे, बाळाराम ठाकूर, दत्ता वझे, बबन पाटील यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.           यावेळी सदस्य म्हणाले, जमिनीसाठी लढा सुरू आहे, जमीन जी आहे ती आपल्या हातून बिल्डरच्या हातात गेले तर आपलं अस्तित्व राहणार नाही. प्रथम टॅक्स कमी करून घेतला पाहिजे, अनधिकृत बांधकामे करू नये, जुन्या बांधकामबाबत योग्य भूमिका पालिका घेत नाही. ग्रामीण भागात पाण्याचा त्रास आहे, पालिका तोडकाम करीत आहे, काही जणांना पालिकेत जायचं आहे.यावेळी गुलाब वझे म्हणाले, जाहीर सभा लावू, हा सुर्य हा जयंद्रत अशी ठाम भूमिका घेऊ. आपण १९८३ पासून लढत आहोत. लढायचं असेल तर मग केस झाल्या तरी चालतील असा लढा पूर्वीच्या नेत्यांनी दिला आहे.
             संघर्ष समिती कुठेही मागे पडलेली नाही. कोणीही टॅक्स भरू नका अशी भूमिका यापुर्वीही संघर्ष समितीची होती आणि आजही त्यावर आम्ही ठाम आहोत. पायाभूत सुविधा ग्रामीण भागात मिळत नाहीत. काही राजकारणी लोकांनी करोडो रुपये २७ गावांच्या विषयावर कमावले आहेत.तर आजदेगावचे ग्रामस्थ सत्यवान  म्हात्रे म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे यांनी गणपती बाप्पाचे आगमन खड्ड्यात कसे होते ते पाहण्यासाठी यावे.

Post a Comment

0 Comments