कल्याण पूर्वेतील नागरिकांना मिळणार तज्ञ डॉक्टरां कडून उपचार


■सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी स्टारसिटी हॉस्पिटलचा पुढाकार...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण पूर्वेत चांगले रुग्णालय नसल्याने आरोग्याच्या बाबतीत नागरिकांची परवड होत असते. एखाद्या आजारावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार घ्यायचे असल्यास रुग्णांना मुंबई गाठावी लागते. यामुळे रुग्णांचा पैसा, वेळ दोन्ही खर्च होतो. यावर उपाय म्हणून कल्याण पूर्वेतील स्टारसिटी हॉस्पिटलने पुढाकार घेत वोक्हार्ट हॉस्पिटलच्या सहकार्याने मुंबईतील तज्ञ डॉक्टर नागरिकांच्या उपचारासाठी कल्याण पूर्वेत येणार आहेत. याचा फायदा कल्याण पूर्वेसह ग्रामीण भागातील रुग्णांना होणार आहे.         डॉ. प्रदीप शेलार, डॉ. प्रवीण भुजबळ, डॉ. शशी सिंग, डॉ. उमेश कापूस्कर, डॉ. चंद्रकांत शिवशरण, डॉ. भावेश चौहान, डॉ. राजेश पास्तारीया आदींच्या माध्यमातून सुरु असलेल्या कल्याण पूर्वेतील चक्की नाका येथील स्टारसिटी हॉस्पिटलने मुंबईतील वोक्हार्ट हॉस्पिटलसोबत उपक्रम राबवीत मुंबईतील तज्ञ डॉक्टर येथील नागरिकांच्या उपचारासाठी येणार आहेत.
             यामध्ये न्यूरोसर्जन डॉ माझदा तुरेल (मेंदू आणि मणक्याचे विशेषतज्ञ), ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. इम्रान शेख, स्लीप आणि एपिलीप्सी डीसऑर्डर तज्ञ डॉ. प्रशांत माखीजा, कार्डीवास्क्यूलर सर्जन डॉ. मंगेश कोहळे यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे याठिकाणी आर्थिक दुर्लभ घटकांसाठी विशेष सुविधा देखील उपलब्ध असल्याची माहिती डॉ. प्रदीप शेलार यांनी दिली.       मुंबईतील डॉक्टर कल्याण पूर्वेत येणार असल्याने येथील नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार असून येथील रुग्णांना चांगले उपचार कमी वेळेत मिळणार आहेत. त्याशिवाय या तज्ञ डॉक्टरांकडून अतिशय माफक दरात उपचार केले जाणार आहेत. अशा प्रकारचे नवनवीन उपक्रम स्टारसिटी हॉस्पिटल नेहमी राबवत असते. तसेच आर्थिक दुर्लभ घटकांसाठी विशेष योजना देखील याठिकाणी उपलब्ध असल्याचे डॉ. शेलार यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments