‘त्या’ कार्यकर्त्यांचा शिवसेना भाजपा कडून सत्कार
कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा कल्याण मध्ये चांगलेच पडसाद उमटले आहेत. शिवसेनेने भाजपा कार्यालय फोडल्यानंतर कल्याण मधील राजकारण चांगलेच तापले आहे. एकीकडे भाजपा कार्यलय फोडणारया शिवसैनिक अमोल गायकवाड याचा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. तर दुसरीकडे भाजपा कार्यकर्ता प्रताप टूमकर यांचा देखील भाजपा पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला आहे.जेव्हा शिवसैनिकांनी भाजपा कार्यालयावर हल्ला केला तेव्हा मारहाण होऊन देखील प्रताप यांनी तेथून न हलता तिथेच उभे राहिले. याबद्दल त्यांचा भाजपाच्या वतीने शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तर भाजपा कार्यालयाची काच स्वताच्या हाताने फोडल्याबद्दल शिवसैनिक अमोल गायकवाड याला देखील महानगरप्रमुख विजय साळवी आणि उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे आदी पदाधिकाऱ्यांनी गौरविले.    

Post a Comment

0 Comments