स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रिपाई वाहतूक आघाडीचे प्रयत्न स्टेशन पासून लांब अंतरावरील स्टॅण्डची स्थापना
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रिपाई वाहतूक आघाडी प्रयत्नशील असून कल्याण डोंबिवली शहरात स्टेशन पासून लांब अंतरावरील स्टॅण्डची स्थापना करण्यात येत आहे. याच उपक्रमाअंतर्गत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वाहतूक आघाडीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विलास गायकवाड यांच्या प्रयत्नाने कल्याण पश्चिमेतील लाल चौकी येथे रिक्षाचालकांसाठी रिक्षा स्टॅण्ड उपलब्ध करून देण्यात आला आहे.  


 

      

            या उद्घाटनाप्रसंगी रिपाईचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अण्णा रोकडेयुवक अध्यक्ष संग्राम मोरेवाहतूक आघाडीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष विलास गायकवाडठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद अंगरखेकल्याण शहराध्यक्ष साजिद चौधरीदिवा शहर अध्यक्ष शितल बनसोडेसमाज सेवक तुषार जाधवमदन क्षत्रियराहुल ईप्पनपेल्लीतसेच लाल चौकी रिक्षा स्टॅन्डचे पदाधिकारी धनराज मुकादमविशाल म्हात्रे, विलास पाटीलसंपत पाटीलपंकज क्षत्रियबबलू पाटील व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
            शासनाच्या खुल्या परवाना धोरणामुळे ठाणे जिल्ह्यात विषेशतः कल्याण डोंबिवली उल्हासनगर आदी शहरी भागात भरमसाठ रिक्षांची संख्या वाढली आहे. परंतु वाहतूक विभाग व आर.टी.ओ  कडून कोणत्याही प्रकारची स्टॅण्डची सुविधा नसल्याने रिक्षा स्टेशनच्या दिशेने येतात व स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी होते. ड्रॉप आणि पिकअप एकाच ठिकाणाहून होत असून त्यामुळे प्रवासी व रिक्षा चालकामध्ये वाद निर्माण होतो. यासाठी रिपाईच्या वाहतूक आघाडी संघटनेने महानगरपालिका आयुक्त, आर.टी.ओ. व वाहतूक शाखा यांच्या कडे पत्र व्यवहार करून स्टेशन पासून लांब अंतरावर रिक्षा स्टॅण्डची मागणी केली होती. 

         या मागणीनुसार रिपाई वाहतूक आघाडी ठाणे जिल्ह्याच्या वतीने कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या शहरात १३ स्टॅण्ड सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये कल्याण ते कोनकल्याण ते भिवंडीकल्याण ते पडघाप्रेम आटो ते स्टेशनसाधना हॉटेल ते मानपाडालालचौकी ते बायपासचुचक नाका ते स्टेशनआधारवाडी (रिलायन्स) ते स्टेशन, सर्वोदय सागर ते स्टेशन, सागर हॉटेल ते पनवेल, दिवा स्टेशन ते गणेशनगरमेट्रो मॉल ते कल्याण स्टेशन, कृषी उत्पन्न बाजार समिती ते ऑल महाराष्ट्र आदी स्टॅण्डचा समावेश आहे. या स्टॅण्डचे सुमारे १५०० सदस्य आहेत.
दरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आर.पी.आय. वाहतूक आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष पदाची जवाबदारी आपल्यावर सोपवली असून आगामी काळात उल्हासनगर, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, वसिंद, शहापूर, भिवंडी, नवी मुंबई, ठाणे आदी ठिकाणी रिक्षा चालकांसाठी रिक्षा थांबा होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष विलास गायकवाड यांनी दिली.

Post a Comment

0 Comments