मेंदू आणि मणक्याच्या उपचारासाठी तज्ञ डॉक्टर कल्याण मध्ये सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये आर्थिक दुर्लभ घटकांसाठी विशेष सुविधा
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  मेंदू आणि मणक्याच्या आजारावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेण्यासाठी कल्याण आणि आसपासच्या नागरिकांना मुंबई ठाण्याला जावे लागत होते. मात्र आता कल्याणमध्येच मेंदू आणि मणक्याच्या उपचारासाठी मुंबईमधील तज्ञ डॉक्टर उपलब्ध होणार आहेत.           कल्याण पश्चिमेतील मुरबाड रोड येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये वोक्हार्ट होस्पिटल मुंबई सेंट्रल येथील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ माझदा तुरेल (मेंदू आणि मणक्याचे विषेशज्ञ) महीन्याच्या दुसर्‍या मंगवारी नागरिकांच्या उपचारासाठी उपलब्ध असणार असल्याची माहिती सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉ. अभय गायकवाड यांनी दिली. त्याचप्रमाणे याठिकाणी आर्थिक दुर्लभ घटकांसाठी विशेष सुविधा देखील उपलब्ध आहेत.         कल्याणमध्ये मेंदू आणि मणक्याच्या आजारावर उपचार करणारे तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने कल्याण डोंबिवली तसेच आसपासच्या शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांना ठाणे अथवा मुंबई शहर गाठावे लागत होते. यामुळे येथील नागरिकांचा वेळ आणि पैसा देखील वाया जात होता.            मुंबईला उपचार घेणे परवडत नसल्याने अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागत आहे. यावर उपाय म्हणून कल्याण मधील सिद्धिविनायक हॉस्पिटलने मुंबई मधील मेंदू आणि मणक्याचे विषेशज्ञ न्यूरोसर्जन डॉ माझदा तुरेल यांना महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी नागरिकांच्या उपचारासाठी पाचारण केले आहे.      सध्या वर्क फ्रॉम होम मुळे नागरिकांमध्ये मेंदू आणि मणक्याचे आजार जास्त प्रमाणात आढळून येत असून यावर मुंबईमध्ये जे चांगले उपचार केले जातात तेच चांगले उपचार याठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती न्यूरोसर्जन डॉ माझदा तुरेल यांनी दिली.         तर सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन आणि एमआरआय सोडल्यास इतर सर्व सोयी एकाच छताखाली उपलब्ध आहेत. यामध्ये १० बेड आयसीयु, ७ बेड आयसीयु बॅकअप, डायलासीस युनिट, अद्यावत लॅब, कार्डीअॅक सेटअप असून यामध्ये एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, बायपास सर्जरी आदी उपचार करण्यात येतात. तसेच इतरहि अनेक आजारांवर तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. 
          कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग देखील आहे. त्याचप्रमाणे आर्थिक दुर्लभ घटकांसाठी राजीव गांधी आरोग्य योजना, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे पोलिसांसाठीच्या योजना देखील उपलब्ध असल्याची माहिती डॉ. अभय गायकवाड यांनी दिली.      

Post a Comment

0 Comments