ठाकरे सरकारचं डोकं ठिकाणावर नाही - नरेंद्र पवार

 

■शंखनाद आंदोलनात माजी आमदार नरेंद्र पवार यांची शासनावर कडाडून टिका...


कल्याण , कुणाल  म्हात्रे   : राज्यात मदिरा सुरू असून मंदिरे मात्र बंद आहे. मदिरा व मंदिरातील फरक सरकारला कळतं नसून हिंदू धर्मियांच्या मंदिरांना बंद ठेवणाऱ्या ठाकरे सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का अशी कडाडून टीका माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली. मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी कल्याणमधील शंखनाद आंदोलनात पवार बोलत होते. मंदिर हम खुलवायेंगेधर्मको न्याय दिलायेंगे’ अशी हाक देत कल्याण भाजप आध्यात्मिक आघाडीचे संयोजक मधुर पाठक गुरुजी व कल्याण शहर मंडळ अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली लालचौकी येथील गणेश मंदिरासमोर शंखनाद आंदोलना करण्यात आले.मोगलांच्या काळात धर्मावर संकट आलं त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माला एकत्र करून न्याय दिला. आताही तशीच परिस्थिती निर्माण झाली असून हिंदू धर्मावर घाला घालण्याचे काम सुरू आहे. मंदिरे बंद ठेऊन हिंदू धर्मियांची गळचेपी करण्याचे काम ठाकरे सरकार करीत आहे.  भारतीय जनता पार्टी ते कदापी सहन करणार नाही. व्यापारव्यवसायबार व देशी दारूच्या दुकानांना परवानगी असून हिंदूंची मंदिरे मात्र बंदच आहे. सरकारने याबाबत तातडीने मंदिरे उघडण्याची परवानगी दिली नाही तर आक्रमक आंदोलन करावे लागेल असेही पवार म्हणाले.


Post a Comment

0 Comments