ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्याची शिवसेनेची मागणी महावितरण अधिकाऱ्यांची घेतली भेट
कल्याण , कुणाल म्हात्रे : खडवली,  फळेगाव गोवेली  आदि ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी शिवसेनेने केली असून याकरिता टिटवाळा येथील महावितरण कार्यालयात उप अभियंता धीरजकुमार दिवे यांना कल्याण तालुका शिवसेना ग्रामीण विभाग कडून निवेदन देण्यात देण्यात आले. येत्या आठ दिवसांत ग्रामीण भागातील वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा तालुका प्रमुख वसंत लोणे यांनी दिला आहे.यावेळी तालुका प्रमुख वसंत लोणेयुवासेना जिल्हा सचिव अँड अल्पेश भोईरजिल्हा समन्वयक व माजी सरपंच संतोष सुरोशी तालुका सचिव नामदेव बुटेरे बाजार समितीचे संचालक भूषण जाधवपंचायत समितीचे सदस्य रमेश बांगर,  माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र जाधवउपतालुकाप्रमुख प्रमुख कैलास मगरग्रामपंचायत सदस्य अनिल बांगर वैभव दलालसमीर शेलारप्रविण भोईरनितीन विशेरविंद्र टेंबेचौधरी आदी शिवसैनिक उपस्थित होते.अनेक दिवसांपासून ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित होतो तो सुरळीत करण्यात यावा, खडवली महावितरण कार्यालयामध्ये जे. ई नेमण्यात यावा, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्याजुनें विद्युत पोल व वायर बदलून नवीन टाकण्यात याव्या,  चुकीच्या पद्धतीने देण्यात येणारी बिले दुरुस्ती करून देण्यात यावी, वेळेवर नवीन मीटर देण्यात यावे आदी मागण्या यावेळी महावितरण कडे करण्यात आल्या. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या मागण्यांचा विचार करून येत्या आठ दिवसांत जर वीज पुरवठा सुरळीत आणि इतर मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करू याची सर्व जबाबदारी महावितरणची असेल असे इशारा वसंत लोणे यांनी दिला आहे.     दरम्यान याबाबत महावितरणचे उप अभियंता धीरजकुमार दिवे यांनी सांगितले की, मोस गावा लगत काळू नदी जवळ विद्युत फिटर पुराच्या पाण्याने खराब झाला आहे, वायरी तुटल्या आहेत, पोल पडले आहेत.  दुरुस्ती काम सुरू आहेतसेच खडवली येथील महावितरण कार्यालयामध्ये आठवड्यातून दोन दिवस जे ई बसविण्यात येईल. जुनें विद्युत पोल व वायर बसविण्याचे काम सुरू आहे. खडवली येथे सब स्टेशन साठी जागा उपलब्ध करून दिल्यास तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले. 


Post a Comment

0 Comments