मनसे आमदार पाटील यांचे शिवसेनेला प्रतिउत्तर

 डोंबिवली ( शंकर जाधव ) शिवसेनेचे तातडीची पत्रकार परिषद घेऊन विकास कामांबाबत मनसे आमदार श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप करण्यात आला होता.या आरोपाला प्रतिउत्तर देत मनसे आमदार प्रमोद ( राजू )पाटील म्हणाले,विधानसभा बजेट मध्ये जी सार्वजनिक बांधकाम खात्यातील रस्ते मंजूर होतात ती मुख्यत्वे स्थानिक आमदारांच्या शिफारशीने होतात.            कारण आमदार विधानसभेत नेतृत्व करीत असतात आणि संसदेत मंजूर होणारी कामे खासदार सुचवत असतात. त्यामुळे इतरांच्या कामात हस्तक्षेप करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, पदाच्या मर्यादा ठेवाव्यात, खासदारकीवरून खाली येऊ नये, वरच्या पायऱ्या चढाव्यात.पुढे आमदार पाटील म्हणाले, लोकशाही मध्ये लोकप्रतिनिधीनुसार विकेंद्रीकरण केलेले आहे.          खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हापरिषद सदस्य अगदी ग्रामपंचायत पर्यंत, प्रत्येकाला लोकप्रतिनिधीचा दर्जा देऊन अधिकार असतात, त्यामध्ये व्यापक रहायचे असते इथे खासदार मात्र आमदार, नगरसेवक, जिल्हापरिषद अगदी ग्रामपंचायत मधील कामामध्ये श्रेय घेण्यासाठी हस्तक्षेप करताना दिसतात, ही लाजिरवाणी बाब आहे.             सहा विधानसभा मतदारसंघ असलेल्या लोकसभा मतदारसंघात केंद्रीय दर्जाचे प्रकल्प आणून विकासासोबत स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असे होताना दिसत नाही, एवढी वर्षे सत्तेत असतानाही श्रेयासाठी इतर लोकप्रतिनिधीच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करून श्रेय घेणे शोभादायक नाही. 

Post a Comment

0 Comments