केडीएमटी परिवहन सेवेच्या बहुतांश बस भंगारात फक्त २५ बसेस आँनरोड चालू स्थितीत
कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या परिवहन उपक्रमातील नागरिकांकरिता प्रवासासाठी असलेल्या दोनशे पेक्षा अधिक बसेस कोरोना काळात वाहतूक सेवा बंद असल्याने धूळखात पडून असतानाच आजच्या स्थितीत केवळ २० ते २५ बस रस्त्यांवर धावताना दिसून येत असून उर्वरित बसगाड्या जवळ जवळ भंगारातच पडून असून कर्मचारी वर्गाला ही कामं नसल्याची माहिती एका विश्वसनीय माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.कल्याण परिवहन उपक्रमाने विविध भागात लोकांच्या व प्रवाशांच्या मागणीनुसार बससेवा सुरू केली होती. कल्याण परिवहनचा आगारात बसची संख्या जास्त असल्याने पनवेल वाशी तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ग्रामीण विभागात या गाड्या धावत असल्याने आर्थिक फायदाही मिळत होता. दीड वर्षाच्या कोरोना संसर्गाच्या कालावधीत लॉकडाउन लागल्याने सुरू असलेल्या बसेसला ब्रेक लागल्याने परिवहनच्या आगारात त्या उभ्याने पडून होत्या. परिवहन आगारात किमान दोनशे च्या वरती बस बंद पडून राहिल्याने लॉकडाऊन मध्ये बसगाड्यांची अवस्था दयनीय झाली आहे.लॉकडाऊन अवस्थेतून कल्याण डोंबिवली महानगरपालिका बाहेर पडलेली असतानाच परिवहन सेवा मात्र जीर्ण अवस्थेत पडून राहिल्याने दुरुस्ती करण्यापलीकडे उपायही शिल्लक नसल्याने आजच्या घडीला कल्याण-डोंबिवलीतील केवळ शहरी भागात २० ते २५ बसेसची परिवहन सेवा सुरू आहे. दीड वर्षाच्या कालावधीत परिवहन उपक्रमाने उभ्या करून चांगल्या अवस्थेत असणाऱ्या गाड्यांना भंगाराचे स्वरूप प्राप्त करून दिले आहे. परिवहन उपक्रमात काम करीत असणारे चालक व कंडक्टर यांना आठ तासांची ड्युटी असून त्यानंतर त्या बसेसच्या चालकांना आगारात बसवून दुसऱ्या चालकाकडे त्याचा ताबा देऊन दुसरी कडचा प्रवाशी फेरा मारायला सांगत असल्याची माहिती देण्यात आली आहे.मोठ्या संख्येने बस उपलब्ध असतानाही परिवहनचा उपक्रमातील अधिकाऱ्यांनी उभ्या केलेल्या बसेसची डागडुजी व काळजी न घेतल्याने रिवहनच्या आगारात केवळ २० ते २५ बस कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रांमध्ये तुरळक फेर्‍या मारीत परिवहन सेवा नावापुरती सुरू ठेवली आहे. परिवहन सेवेत काम करीत असणाऱ्या कर्मचारी वर्गाला आठ तासाच्या कामातील बसेसच्या फेर्‍या मारण्याचे काम उपलब्ध होत नसल्याने त्यांचे दिवसातील कामाचे तास आगारात फुकट जात असल्याचे बोलले जात आहे.साधन उपलब्ध होत नसल्याने कर्मचारी वर्ग हातावर हात ठेवून आहेत. गाड्यांचे आयुर्मान जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्या गाड्या भंगारस्थितीतच पडून असून कोरोनाच्या दीड वर्षाच्या कालावधीत मात्र परिवहन उपक्रमाला ग्रहण लागले आहे. मोठा गाजावाजा करीत कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाने जवळजवळ दहा वातानुकूलित बस गाड्या विकत घेत नागरिकांच्या सेवेकरिता रिंगरुट तसेच वाशी कल्याण अशी सेवा उपलब्ध करून दिली होती. एका बसची किंमत किमान ८० लाख रुपये असून यातील सात बसगाड्या भंगार अवस्थेत पडून असून फक्त तीन वातानुकूलित बसगाड्या कल्याण-डोंबिवलीत सुरू आहेत.कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचे आयुक्त डॉक्टर दीपक सावंत यांना परिवहनच्या बंद पडलेल्या बसेस बाबत विचारणा केली असता 35 ते 45 टक्के बस सुरू असून उर्वरित बंद असल्याची माहिती देत जुन्या आणि नव्या बस बंद असून २०० पेक्षा जास्त बस आगारात असल्याची माहिती देऊन दहा एसी बस पैकी तीन बसेस सुरू असल्याचे डॉक्टर सावंत यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments