ग़ॅस सिलिंडर दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन

 ठाणे (प्रतिनिधी) -  पेट्रोल- डिझेल दरवाढी विरोधात आज(सोमवार) मुंब्रा येथील तलाठी कार्यालयासमोर, गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड  यांच्या आदेशानुसार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने *मर्जिया शानू पठाण  यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्यात आले.           गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर आकाशाला भिडू लागले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना प्रचंड महागाईचा त्रास सहन करावा लागत असल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने  शहराध्यक्ष आनंद परांजपे, सय्यद अली अश्रफ भाईसाहब,  विरोधी पक्षनेते शानू पठाण, ॠता आव्हाड  आणि कळवा-मुंब्रा विधानसभाध्यक्ष शमीम खान यांच्या मार्गदर्शनाखाली  मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आाले. 

 


            यावेळी बेचारी जनता करे पुकार लुट रही है, मोदी सरकार., करोनाने वाचलो, पण महागाईने मेलो.., अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली. या आंदोलनात महिला आणि तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.            यावेळी मर्जिया शानू पठाण म्हणाल्या की, केंद्रात भाजपाची सत्ता येऊन जवळपास सात वर्षाचा कालावधी होऊन गेला आहे. सात वर्षांपुर्वी 70 रुपये लिटर दराने मिळणारे पेट्रोल, आज 108 रुपयांना मिळत आहे. तर, घरगुती गॅस सिलिंडरचे दर 860 रुपयांवर गेले आहेत. सिलिंडरचे दर वाढल्याचा परिणाम महिला वर्गावरच अधिक झाला आहे. त्यांच्या संसाराचे चक्रच बदलले आहे. या दरवाढीचा परिणाम सर्व स्तरावर होतो आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झालेले असताना.          आता खतांचे दर देखील वाढत आहे. या सर्व दरवाढीमधून शेतात राबवणार शेतकरी ते शहरातील नागरीक सुटला नाही. या पार्श्वभूमीवर आम्ही पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आज आंदोलन करीत आहोत. तसेच, केंद्र सरकारने किमान करोना काळात अनेक नागरिकांच्या नोकर्या गेल्या आहेत. बाजारपेठ ठप्प आहेत, या सर्व बाजूंचा विचार करून, ही दरवाढ मागे घ्यावी. अन्यथा आम्ही ठाण्यात तीव्र आंदोलन उभे करू, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या,.

Post a Comment

0 Comments