दही हंडी उत्सवा वरील बंदीमुळे कुंभार वाड्यातील शेकडो मटकी पडून
कल्याण , कुणाल  म्हात्रे  : दही हंडी उत्सवावरील बंदीमुळे कुंभारवाड्यातील शेकडो मटकी पडून असून यामुळे कुंभार कारागिर मेटाकुटीला आले आहेत. कोरोना नियमावलीत स्थितीत शिथिलत राज्य सरकारने दिल्याने पालिका क्षेत्रात देखील  आयुक्तांनी कठोर निर्बंध उठविले. काही सणांवर मात्र निर्बंधाची जाचक अटींची टांगती तलवार ठेवल्याने श्रावण महिन्यात पहिल्याच येणाऱ्या गोपाळकाला सणासाठी कल्याणातील कुंभारवाडा परिसरात बनवित आलेल्या मातीच्या हंड्या व त्यावर रंगीबेरंगी वॉटर कलर ने विक्रीसाठी सजवून ठेवलेल्या शेकडो हंड्या पडून आहेत.गेल्या वर्षापासून कोरोनाने कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिसरात थैमान घातले. कडक निर्बंधांमुळे काटेकोर पालन न करणाऱ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांना दंडाची मोठी रक्कम भरावी लागत होती. यामुळे विक्री करणार्‍यांचे लॉकडाऊन मध्ये आर्थिक कंबरडे मोडले होते. गेल्या वर्षातील सर्वच जाती समाजातील सणांवर यामुळे निर्बंधाचे सावट असतानाच या वर्षीदेखील फेब्रुवारी महिन्यात आलेली शिवजयंतीमार्च मध्ये महाशिवरात्रीहोळीधुलीवंदनएप्रिलात गुढीपाडवाडॉ.आंबेडकर जयंतीरामनवमीगुड फ्रायडेमे मधील महाराष्ट्र दिनरमजान ईदबौद्ध पौर्णिमाजून मध्ये वटपौर्णिमाजुलैमध्ये बकरी ईद तर ऑगस्ट मधील श्रावण महिन्यातील गोपालकाला या सणांवर देखील कोरोनाच्या निर्बंधाने घाला घातला आहे.कल्याण मधील कुंभारवाडा परिसरात सणांप्रमाणे प्लास्टर ऑफ पॅरिसचिकण मातीच्या मुर्त्या बनविल्या जाऊन त्या विक्रीसाठी ठेवल्या जातात. ऑगस्ट महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात शासनाने कडक निर्बंधात सूट दिल्याने व्यापारी वर्गांसहित लहान-मोठे उद्योग धंदे करणाऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता. दीड वर्षाच्या कालावधीत कुंभारवाड्यात विविध स्वरूपाच्या वस्तू बनविल्या नव्हत्या. मात्र निर्बंधात सूट मिळाल्यानंतर यंदाचा गोपाळकाला निश्चितपाने होणार या अनुषंगाने शेकडो मातीची छोट्या-मोठ्या मटकीची निर्मिती करून त्यावर वॉटर कलर ने रंगरंगोटी करीत विक्री साठी सज्ज  करण्याच्या तयारीत असतानाच सोमवार 23 ऑगस्ट रोजी टास्क फॉर्सच्या निर्णयानुसार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहीहंडी उत्सवावर बंदी घालण्यात आल्याचे जाहीर केले.पिढीजात व्यवसाय करीत असलेल्या कुंभारवाड्यातील कुंभार कुटुंबीयांवर दहीहंडी वर घेतलेल्या बंदीमुळे विक्रीसाठी तयार करून रंगरंगोटीने सजविलेल्या मटक्या पडून राहिल्या आहेत. गेल्या वर्षी लादलेल्या कडक निर्बंधांमुळे नवरात्रोत्सवबैल जोड्यागौरी गणपती मुर्त्यागोपाळकाला साजरा करण्यासाठी मटके काही अंशी बनविले होते. मात्र विक्री न झाल्याने वर्षभरात बनविलेल्या विविध स्वरूपाच्या वस्तू खराब झाल्या होत्या. यावर्षी हिंदू सणांमध्ये गोपाळकाला हा महत्त्वाचा सण निर्बंधातून सुट देऊन साजरा होणार असल्याचे आम्हाला वाटत असल्याने शेकडोने मटके तयार करीत त्यावर रंगरंगोटी करून विक्रीच्या तयारीत असताना शासनाने या सणावर निर्बंध घालीत आमचे उपजीविकेचे साधनच आमच्याकडून हिरावून घेतली असल्याची प्रतिक्रिया कुंभारवाड्यातील चौथी पिढी म्हणून व्यवसाय करणारे संजय कुंभार यांनी व्यक्त केली आहे.शासनाने दहीहंडीवर घेतलेला निर्णय हा उशिरा घेतला असून मागील वर्षाप्रमाणे या वर्षी मात्र आमचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने याबाबत आम्हाला आर्थिक मदत करावी अशी अग्रही मागणी व्यवसायावर उपजीविका करणाऱ्या कुंभारवासीयांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments