Header AD

सोशल मिडीयावर डॉ. बाबासाहेबांचा अवमान रिपाइं एकतावादीने दिला आंदोलनाचा इशारा




ठाणे (प्रतिनिधी)  - अतिशय अश्लील भाषेत भाररत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मुंब्रा येथील एका इसमाने फेसबुक पोस्ट केली आहे. त्याच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन गजाआड करावे, अन्यथा रिपाइं एकतावादीचे नेते भैय्यासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रिपाइं एकतावादीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण यांनी दिला आहे.  



          या संदर्भात राजाभाऊ चव्हाण आणि राजकुमार मालवी यांनी नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्षिरसागर यांना निवेदन दिले आहे.   अब्दुलरहिम घडियाली (रा. मुंब्रा) असे या समाजकंटकाचे नाव आहे. त्याने आपल्या फेसबुक अकाउंटवर अत्यंत चुकीच्या पद्धतीने गृहनिर्माण मंत्री यांना लक्ष्य करुन बाबसाहेब आंबेडकर यांची विटंबना केली आहे. तसेच संविधानाचाही अवमान केला आहे.



            त्यामुळे त्याच्यावर  अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 3 (1) (पाच), मााहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 आणि भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 295,  भा. दं. वि. 153 अ , 295,  295 अ  अन्वये तत्काळ गुन्हा दाखल करुन नौपाडा पोलिसांनी अटक करावी; अन्यथा, ससबंध जिल्ह्यात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही चव्हाण यांनी दिला आहे.

सोशल मिडीयावर डॉ. बाबासाहेबांचा अवमान रिपाइं एकतावादीने दिला आंदोलनाचा इशारा सोशल मिडीयावर डॉ. बाबासाहेबांचा अवमान रिपाइं एकतावादीने दिला आंदोलनाचा इशारा Reviewed by News1 Marathi on August 17, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads