कोकणातील पूरग्रस्तांसाठी काँग्रेसची मदतफेरी व्यापारी वर्गाचा उस्फूर्त प्रतिसाद
ठाणे , प्रतिनिधी  :  कोकणातील पूरग्रस्त तालुक्यातील बाधितांना मदत करण्यासाठी शहर काॅग्रेसच्या प्रभाग क्रमांक 22 मधील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ठाण्यातील मार्केट परिसरात मदत फेरी काढून मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तू संकलित केल्या.


             कोकणातील पूरग्रस्त नागरीकाकरिता विविध सघटना आपापल्या पद्धतीने आवश्यक ती मदत पाठवित आहे ठाण्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष अॅड विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जांभळी नाका व बाजार पेठ परिसरातील रस्त्यावर मदत फेरी काढून जीवनावश्यक साहित्य जमा केले या मदतफेरीला व्यापारी बांधवानी मोठ्या प्रमाणात आवश्यक असे साहीत्य देऊन उस्फूर्त प्रतिसाद दिला.           या फेरी मध्ये महिलांसाठी सॅनिटरी नॅफकीन्स, गाउन्स,टिळक शर्ट्स,लेडीज-जेन्डस चप्पला, फीनाईल्स, साबण,सुखे फरसाण,अन्नधान्य,पाण्याच्या बाॅटल्स,झाडू,खराटे इत्यादी आवश्यक साहीत्य संकलित झाले याप्रसंगी ठाणे जिल्हा इंटक काॅग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे,शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष ठोंबरे,काँग्रेस प्रभाग अध्यक्ष अॅड.हिदायत मुकादम,युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रवीण खैरालिया,बाबू रंगारी,अफजल तलवलकर,मुश्ताक पावसकर,अंकुश चिंडालिया,अन्वर पिंजारी अजय चिंडालिया आदि पदाधिकारी उपस्थित होते.


          याप्रसंगी बोलताना सचिन शिंदे यांनी सागितले की,खरेतर कोकणातील पूरग्रस्त बाधितांना अडचणी रोज विविध माध्यमातून लोकांना कळत होत्या सर्वाना काही ना काही मदत द्यावी असे वाटत होते परंतु नक्की कुठे व कशी मदत करावी हे समजत नव्हत म्हणून या मदत फेरीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापारी बाधवांसह खरेदीला आलेल्या नागरिकांनीही मदत देण्याचा प्रयत्न करित होते.व्यापारीही एक जबाबदारी म्हणून स्वतःहूनच मदत देऊ करत होते.लवकरच हि मदत घेऊन काँग्रेस कार्यकर्ते कोकणातील मदतकेंद्र येथे सुपूर्त करण्यात येणार असल्याचे सांगितले. 

Post a Comment

0 Comments