Header AD

लसबाबत `तुतु-मै मै`बंद करा अन्यथा रस्त्यावर फिरकू देणार नाही मनसेचा इशारा


 डोंबिवली ( शंकर जाधव ) करोना प्रतिबंधक लसीबाबत तूटवडा असल्याने एकीकडे नागरीक पुरते हैराण झाले असतात दुसरीकडे राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकमेकांकडे बोट दाखवतात.यावर मनसेने दोन्ही सरकारची कानउघडणी करत लसबाबत `तुतु-मै मै`बंद करा.येत्या निवडणुकीत मतदान मागण्यासाठी बाहेर पडाल तर रस्त्यावर फिरकू देणार नाही असा शिवसेना आणि भाजपचे नाव घेता मनसेने इशारा दिला आहे.
         डोंबिवली फोटोग्राफर सोसायटी  या संस्थेने मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांच्याकडे फोटोग्राफरसाठी लस उपलब्ध करून द्या अशी मागणी केली होती.याकडे लक्ष देत आमदार पाटील यांनी १९ ऑगस्ट जागतिकक फोटोग्राफी दिनानिमित्त डोंबिवली पूर्वेकडील सर्वेश सभगृहात कोव्हीशिल्द लस उपलब्ध करून दिली. केंद्र आणि राज्य सरकारने हि सोय करायला हवी. परंतु आमदार पाटील पाटील यांनी मानवतावादी द्रुष्टीने लसीकरणाची मोहीम समाजातील घटकांसाठी राबविली आहे. 

     आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी १५० छायाचित्रकारांना लस उपलब्ध करुन दिल्याची माहिती उपविभाग अध्यक्ष विवेक भणगे यांनी दिलीमनसेचे जिल्हा सचिव प्रकाश माने म्हणाले,गेल्या अनेक दिवसापासून कल्याण डोंबिवली शहरात लसिकरणाचा तुटवडा असून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या मुळे लाभार्थी लसीकरणापासून मोठ्या संख्येने वंचित आहेत. मोफत लस उपलब्ध करून देण्याऐवजी भाजप ७८० रुपये घेउन सशुल्क लस कार्यक्रम राबविण्यात रस घेते.

         लोकांचा जीव वाचविण्यासाठी राज्य सरकारने `तुतु-मै मैबंद करावे अन्यथा येत्या निवडणुकीत रस्त्यावर फिरुकु देणार नाही असा इशारा दिला.आमदार पाटील काही दिवसांपूर्वी डोंबिवलीत रिक्षाचालकनाभिकपत्रकारमनसेचे पदाधिकारी यांच्या लसीकरणाची सोय केली होती. 

          यावेळी जिल्हा संघटक हर्षद पाटील, जिल्हा सचिव प्रकाश माने, डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत,अरुण जांभळे, संदीप ( रमा ) म्हात्रे, उपविभाग अध्यक्ष विवेक भणगे, महिला शहर अध्यक्षा मंदा पाटील, माजी नगरसेविका सरोज भोईर, सुमेध्ता थत्ते, प्रतिभा पाटील,श्रीकांत वारंगे, स्मिता भनगे,ओम लोके, प्रेम पाटील, सागर मुळए, विकी चौधरी, संजय सरमळकर यासह अनेक मनसैनिकांनी अथक मेहनत घेतली.     

लसबाबत `तुतु-मै मै`बंद करा अन्यथा रस्त्यावर फिरकू देणार नाही मनसेचा इशारा लसबाबत `तुतु-मै मै`बंद करा अन्यथा रस्त्यावर फिरकू देणार नाही मनसेचा  इशारा Reviewed by News1 Marathi on August 19, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads