कल्याण पूर्वेतील ७०० रिक्षा चालकांचे लसीकरण


■रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन आणि केडीएमसीच्या वतीने लसीकरण...


कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनआरोग्य विभाग कल्याण डोबिवंली महापालिका आणि नॅन्सी फायनान्स यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण पूर्वेतील ७०० रिक्षा चालकांचे मोफत लसीकरण करण्यात आले. यावेळी रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनचे कल्याण पूर्व अध्यक्ष सुबल डे, कार्याध्यक्ष जॉन कॅलीमिनो, विलास वैद्य, जितु पवार, संतोष नवले, नॅन्सी फायनान्सचे शाबु चेरियन आदींसह रिक्षा असोसिएशनचे पदाधिकारी आणि रिक्षाचालक उपस्थित होते.      रिक्षाचालक राञं दिवस शहरात व इतर ठिकाणी प्रवासी वाहतुक सेवा बजावत असतात अनेक प्रकारे विविध प्रवाशी नागंरीकाशी नित्य रोज संर्पक येतो. कोरोना काळात खबरदारी सुरक्षितता याकरीता प्राधन्याने रिक्षा चालकांचे लसिकरण करावे अशी मागणी संघटनेच्या वतीने केडीएमसी आयुक्त डाँ. विजय सुर्यवंशी यांच्याकडे करण्यात आली होती. 
याबाबत रिक्षा चालकांच्या लसीकरणासाठी महापालिकेने सकारात्मकता दर्शवत रिक्षा चालकांसाठी विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. याआधी कल्याण पश्चिम मध्ये आयोजित लसीकरण शिबिरात ११०० रिक्षाचालकांचे लसीकरण करण्यात आले होते.कल्याण पूर्वेतील रिक्षा चालकांच्या लसीकरणासाठी देखील रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनच्या वतीने पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानुसार शनिवारी कल्याण पूर्वेतील काटेमानिवली नाका येथे रिक्षा चालकांसाठी विशेष लसीकरण मोहीम घेण्यात आली. या शिबिरात ७०० रिक्षाचालकांचे लसीकरण करण्यात आले. दररोज शेकडो प्रवाशांशी प्रत्येक रिक्षाचालकाचा संपर्क येत असतो त्यामुळे रिक्षाचालकांचे लसीकरण होत असल्याने कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी मोठा फायदा होणार आहे.दरम्यान रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशनने पुढाकार घेत रिक्षाचालकांचे लसीकरण केल्याबद्दल संघटनेचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments