प्रभाग क्र २९ मध्ये ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ


■विभाग प्रमुख मोहन उगले यांच्या प्रयत्नांना यश आमदार विश्वनाथ भोईर यांच्याहस्ते कामाला सुरवात...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण पश्चिमेतील प्रभाग क्र २९ ठाणकर पाडा येथे ड्रेनेज लाईन टाकण्याच्या  कामाचा शुभारंभ आमदार विश्वनाथ भोईर यांच्याहस्ते करण्यात आला आहे. शिवसेना विभाग प्रमुख तथा नगरसेवक मोहन उगले यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.           कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील कल्याण पश्चिम मधील प्रभाग क्रमांक २९ ठाणकर पाडा येथील सिद्धिविनायक सोसायटीमध्ये ड्रेनेज लाईन खराब झाल्याने नागरिकांना घाणीच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. ड्रेनेज लाईनचे पाणी बाहेर येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत होती. या समस्येबाबत येथील स्थानिक नागरिकांनी शिवसेना विभागप्रमुख तथा नगरसेवक मोहन उगले यांना माहिती दिली.         सध्या केडीएमसी मध्ये प्रशासकीय राजवट असल्याने  नवीन विकासकामांना खीळ बसला आहे.  मात्र नागरिकांची हि समस्या सोडवणे देखील गरजेचे असल्याने नगरसेवक मोहन उगले यांनी याबाबत पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून या कामाला मंजुरी मिळवली आहे.

 

  

        सिद्धिविनायक सोसायटीमधील ड्रेनेज लाईनचे काम सुरु करण्यासोबतच शिवम कॉलनी परिसरातील उघडे गटारेपायवाट आणि पाण्याची लाईन कामाचा देखील यावेळी शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, उपजिल्हा प्रमुख  अरविंद मोरे, माजी नगरसेवक जयवंत भोईर, माजी नगरसेवक विद्याधर भोईर, माजी नगरसेवक विजय काटकर, माजी नगरसेविका वैशाली भोईर,  महिला शहर संघटक सुजाता धारगरकर, महिला शाखा संघटक नेत्रा मोहन उगले, मीना सावंत, सुरेखा दिघे,  कल्पना जमदारे, सुनिता मोरे शाखा प्रमुख स्वप्नील मोरे, अनंता पगार राजा साबळे, सचिन भाटे, पिंटू दुबे, संदीप पगारे, उमेश भुजबळ, , दीपक भालेराव, प्रदीप मोरे,  आशिष झाडेप्रदीप हुले ,निलेश चोणकर आदी पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments