फळेगाव येथे ११ वी, १२ वीचे वर्ग सुरु करण्याची ग्रामस्थांची मागणी
कल्याण , कुणाल  म्हात्रे : फळेगाव येथे ११ वी१२ वीचे वर्ग सुरु करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून याबाबत छत्रपती विद्यालयाला निवेदन देण्यात आले आहे.कल्याण तालुक्यातील फळेगावनडगावदानबावरुंदेउशीदहालमढआंबीवली या गावांतील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी गोवेली किंवा कल्याण मधील कॉलेज असे दूर अंतरावर जावे लागते. त्यामुळे येथे जाण्यासाठी  लागणारा वेळमुलां-मुलींची सुरक्षिततापालक वर्गाला बसणारा आर्थिक फटका या सर्व बाबींचा विचार करून नुकतच फळेगाव येथे ११वी आणि १२ वीचे आर्ट्सकॉमर्स व सायन्सचे वर्ग सरू करण्याबाबत छत्रपती विद्यालय यांना निवेदन देण्यात आले.यावेळी गावातील सरपंचपोलीस पाटीलसामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना वह्या देखील वाटप करण्यात आल्या. भविष्यात फळेगाव येथे ११ वी, १२ वी चे वर्ग लवकरात लवकर सुरु व्हावेत अशी भावना अनेक पालकानी व्यक्त केली आहे.


Post a Comment

0 Comments