ओबीसी आरक्षणासाठी कॉंग्रेस आक्रमक केंद्र शासनाने सुप्रीम कोर्टाला इम्पिरियल डाटा देण्याची मागणी


■कल्याण मध्ये तहसील कार्यालयावर कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची धडक...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : केंद्र शासनाने ओबीसींचे राजकीय आरक्षण परत देण्यासाठी सुप्रीम कोर्टाला इम्पिरियल डाटा सुपूर्त करण्याची मागणी कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाकडून पत्राद्वारे राष्ट्रपतींकडे करण्यात आले असून याबाबत कल्याणमध्ये महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष जयदीप सानप आणि इतर पदाधिकाऱ्यांनी नायब तहसीलदार सुषमा बांगर यांना निवेदन दिले.महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार, ओबीसी प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांच्या आदेशानुसर देशभर राज्यभर आंदोलन करण्यात येत असून त्यांच अनुषंगाने आज कल्याण तहसीलदार यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना ओबीसी आरक्षणाबाबत निवेदनासह   आंदोलनाच्या सूचना देण्यात आल्या. सन २००७ ते २०१४ पर्यंतचा ओबीसी इंप्रियल डेटा भारत सरकार जवळ तयार असून केंद्र शासन सदर डेटा सुप्रीम कोर्टात देण्यास टाळम टाळ करित आहे.केंद्रातील भाजपा सरकार दुहेरी चाल चालत असून, कधी मंडल तर कधी कमंडलच्या गोष्टी करतात. ओबीसी समाजासाठी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंह यांनी जनगणनेच्या आधारावर आरक्षण देण्याचे नियोजन केले होते तो डाटा केंद्र सरकार जाहीर करत नसून जो इम्पिरियल डाटा केंद्र सरकारने लपवून ठेवला आहे तो डाटा त्वरित सुप्रीप कोर्टाच्या हवाली करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश मुथा यांनी केली आहे.तर १५ ते ३० नोव्हेंबर दरम्यान इम्पिरियल डाटा केंद्र सरकार ने सुप्रीम कोर्टात सादर न केल्यास  देशभर आंदोलने  करण्यात येणार  असून यामध्ये दिल्ली जंतर मंतर येथे आंदोलन, जेल भरो आंदोलन, जलसमाधी घेऊन आंदोलन, तहसीलदार कार्यालय येथे आंदोलन तसेच आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष जयदीप सानप यांनी दिली.यावेळी एमपीसीसीचे  प्रदेश सचिव प्रकाश मुथा, ओबीसी सेलचे ब्लॉक अध्यक्ष जयदीप सानपमाजी नगरसेवक इफ्तेखार खान, कॉंग्रेस पदाधिकारी बाबा तिवारी,राजा जाधवलखपतसिंह राजपूत,सलीम शेख,शिबू शेख,आजम शेख,संगीता भोईरविद्या चव्हाण,रीना खांडेकर,शिफा महशर पावले, मदन जयराज आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.  

Post a Comment

0 Comments