Header AD

कल्याणमध्ये लसीकरणाला गरोदर महिलांचा प्रतिसाद वाढला


वैष्णवी रुग्णालयात तीन आठवड्यात ३०० गर्भवती महिलांचे लसीकरण कल्याणच्या डॉ. अश्विन कक्कर यांचा पुढाकार...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण आवश्यक असून कल्याणमध्ये या लसीकरणाला गरोदर महिलांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. कल्याण पश्चिमेतील वैष्णवी रुग्णालयात तीन आठवड्यात ३०० गर्भवती महिलांचे लसीकरण करण्यात आलं असल्याची माहिती डॉ. अश्विन कक्कर यांनी दिली.केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांनूसार कल्याणच्या वैष्णवी मॅटर्निटी रुग्णालयात गर्भवती महिलांचे शासकीय दरामध्ये लसीकरण सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनुभव पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या मंजुरीनंतर कोणतीही गर्भवती महिला कोव्हिन अ‍ॅपवर लसीकरणासाठी नोंदणी करू शकतेकिंवा जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेऊ शकते. त्याबाबतच्या मार्गदर्शन सूचनाही केंद्र सरकारने जारी केल्या असून त्या सर्वांचे पालन करूनच कल्याणच्या वैष्णवी रुग्णालय लसीकरण केंद्रांवर गर्भवती महिलांचे लसीकरण केले जात आहे.याठिकाणी लस घेण्यासाठी इच्छुक गर्भवती महिलांना कोणत्याही प्रकारे रांगेत उभे राहवं लागत नसून आधी या लसीकरणाला कमी प्रतिसाद होता. आता गरोदर महिलांचा लसीकरणाला प्रतिसाद वाढला आहे. गरोदर महिलांनी लस घेणे हे त्या माहिलेच्या आणि बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचं असून  वैष्णवी प्रसूतीगृह असल्याने आम्ही गर्भवती महिलांच्या लसीकरणाला प्राधान्य दिल्याची माहिती डॉ. अश्विन कक्कर यांनी दिली. 

कल्याणमध्ये लसीकरणाला गरोदर महिलांचा प्रतिसाद वाढला कल्याणमध्ये लसीकरणाला गरोदर महिलांचा प्रतिसाद वाढला Reviewed by News1 Marathi on August 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads