रविवारच्या दिवशी टपाल कर्मचाऱ्यांनी ठाणे विभागात केले २४ हजार ६८९ राख्यांचे वितरण सुट्टीच्या दिवशी टपाल कार्यालये सुरू
कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  रविवार हक्कांचा आणि सुट्टीचा दिवस, रक्षाबंधन नेमके या सुट्टीच्या दिवशी आले असतानाच ठाणे पोस्टल डिव्हिजनच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या चाळीस पोस्ट ऑफिसमध्ये बहिणींनी पाठवलेली राखी मिळावी याकरिता सुरू ठेवत पोस्टमन कर्मचाऱ्यांनी आज २४ हजार ६८९ राख्या टपालच्या बटवाडा वाटप केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.ठाणे पोस्टल विभागात ४० पोस्ट ऑफिसेस येत असून उर्वरित ग्रामीण भागात ब्रांच पोस्ट ऑफिस कार्यरत आहेत. रविवारच्या सुट्टीच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण आल्याने डाक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सणाच्या दिवशी पोस्टमन कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आदेश देऊ केले होते. ठाणे विभागात जोमाने कार्यरत असणाऱ्या ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉइज युनियनने (एन एफ पी ई) याबाबत कर्मचाऱ्यांना सुट्टीच्या दिवशी कामावर येण्याची विनंती केल्याने कार्यरत असणारे २७२ महिला व पुरुष कर्मचारी कामावर रुजू होते. साडे चोवीस हजारांपेक्षा राख्यांचे आलेल्या टपालाचे घरोघर जात वाटप केले.४० कार्यालयात तसेच ग्रामीण टपाल कार्यालयात सुट्टीच्या दिवशी कर्मचारी वर्ग राखी टपालाचे वाटप घरोघरी जाऊन करीत असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण करून कर्मचारी वर्गाबद्दल आपुलकीची भावना ही या निमित्ताने अधोरेखित झाली. रक्षाबंधनाच्या दिवशी राखी स्पेशल डे मध्ये सर्वसाधारण राख्यांचे १३,९०० पाकिटे आली होती. त्यात ८९७ रजिस्टर्ड पत्राद्वारे तर ८,८९२ स्पीड पोस्ट द्वारे देश-परदेशातून अशी २४,६८९ निव्वळ राखीचे टपाल वितरणासाठी आले होते. पोस्टल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राखी टपाल वाटपाचा सेल्फी फोटो घेण्याचाही फतवा काढला होता. महिला व पुरुष पोस्टमनचे काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाने अगदी हसतमुख चेहऱ्याने वाटपाचे काम जोमात सुरू केल्याने वरिष्ठ अधिकारी वर्गाने देखील कर्मचारी वर्गाचे विशेष कौतुक केले आहे.देश-परदेशात असणाऱ्या भगिनी राखी पौर्णिमेच्या दिवशी भावानंकडे कारणास्तव येण्यास मिळत नसल्याने भावा पर्यंत टपालाद्वारे राखी भेटणारच या विश्वासाने आजही या भगिनींनी टपाल कार्यालयावर विश्वास प्रकट करतांना दिसून येत आहेत. ठाणे विभागातील डिलिव्हरी सेंटर असणाऱ्या चाळीस टपाल कार्यालये रविवारच्या दिवशी उघडी ठेवून २७२ कर्मचाऱ्यांनी एकाच दिवशी आलेल्या राखीच्या टपालांचा निपटारा करून आपले कर्तव्य पार पाडले असून ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज (एन एफ पी ई) युनियनचे ठाणे सचिव आनंता म्हसकर यांनी कर्मचारी वर्गाला धन्यवाद दिले आहेत.दीड वर्षाच्या कालावधीत कोरोना काळात संसर्गाची रेलचेल सुरू असतानाही जीवावर उदार होत पोस्टमन महिला- पुरुष कर्मचारीवर्ग डगमगला नाही. अनेकांना या कालावधीत कोरोना चा संसर्ग होऊन बाधित झाले होते तर काही पोस्टमॅन कर्मचारी वर्ग यांचा मृत्यूही झाला होता. कोरोना काळात नागरिकांची येणारे महत्त्वाचे टपाल तरुणांना येणारे कॉल्स लेटर मनीऑर्डरआदी महत्त्वाचे लेटर कामावर येत पोस्टमन कर्मचारी वर्गाने काम करून कर्तव्य बजावले होते.

Post a Comment

0 Comments