Header AD

ठाण्यात अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु


■शहरातील दीर्घ आजार पणामुळे तसेच शारीरिक अपंग त्वामुळे अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांना ठाणे महापालिकेच्या वतीने घरी जावून कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे.


ठाणे , प्रतिनिधी  : शहरातील दीर्घ आजारपणामुळे तसेच शारीरिक अपंगत्वामुळे अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांना ठाणे महापालिकेच्यावतीने घरी जावून कोरोना प्रतिबंधक लस देण्याच्या विशेष मोहीमेला सुरुवात झाली असून आज 3 रुग्णांना लस देण्यात आली.



       ठाणे महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेतंर्गत ज्या नागरिकांना जागेवरुन हलता येत नाही, कॅन्सरचे रुग्ण, अनुवंशिक विकार असणारे रुग्ण, प्रतिकारशक्ती कमी असलेले रुग्ण किंवा जे बरेच महिन्यांपासून अंथरुणाला खिळलेले आहेत अशा नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लस देण्याची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.



        या लसीकरण मोहिमेत आजपर्यंत २१ नागरिकांनी नोंदणी केली त्यापैकी ६ नागरिकांनी योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर आज पहिल्या दिवशी माजीवडा मानपाडा प्रभाग समितीमधील ३ नागरिकांना लस देण्यात आली. यावेळी सर्व रुग्णांनी महापालिका प्रशासनाने आभार मानले.


       

       या लसीकरणासाठी पूर्व नोंदणी आवश्यक असून यासाठी महापालिकेच्यावतीने गूगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. नागरिकांनी https://forms.gle/E3n36oj81pMniVLA7 या लिंकवर जाऊन आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर अशा रुग्णांना घरी जाऊन लस देण्यात येत आहे. यामध्ये अशा व्यक्तींचं किमान सहा महिने अंथरुणात खिळून राहणार असल्याबाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र, लस घेण्यासाठी अशा व्यक्तींचे संमती पत्र किंवा नातेवाईक यांचे संमतीपत्र प्रशासनाला सादर करणे आवश्यक आहे.



        दरम्यान आजारपणामुळे तसेच शारीरिक अपंगत्वामुळे अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांनी या लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.    

                                                   

ठाण्यात अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु ठाण्यात अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु Reviewed by News1 Marathi on August 14, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads