राष्ट्रवादीच्या संदीप देसाई यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन


कल्याण , कुणाल  म्हात्रे  : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष संदीप देसाई यांच्या सह्याद्री नगर येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, कार्याध्यक्ष वंडार पाटील, समाजसेवक किशोर देसाई, कल्याण पश्चिम विधानसभा कार्याध्यक्ष उदय जाधव, ब प्रभाग क्षेत्र अध्यक्ष भगवान साठे, राष्ट्रवादीचे सुभाष गायकवाड, योगेश माळी, श्याम आवारे आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.           आगामी काळात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका असून सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने पदाधिकारी जोमाने काम करत असून कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात देखील राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी संदीप देसाई यांचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी देसाई यांनी कल्याण पश्चिमेतील आर.टी.ओ. नजीक सह्याद्री नगर याठिकाणी जनसंपर्क कार्यालय सुरु केले असून त्याचे उद्घाटन स्वातंत्र्यदिनी करण्यात आले. 


Post a Comment

0 Comments