पॅण्टीन टू-इन-वनने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या देखण्या मानुषी छिल्लरला दिला केसगळती शिवाय मोकळ्या केसांचा अनुभव■मानुषी छिल्लर शिफारस करत आहे एकाच बाटलीतून शॅम्पू व कंडिशनर देणाऱ्या पॅण्टीन टू-इन-वनची ...


मुंबई, 30 ऑगस्ट २०२१ :  माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लर आता तरुणांचा आवडता आयकनिक हेअर केअर ब्रॅण्ड पॅण्टीन सोबत जोडली गेली आहे. मानुषी पॅण्टीनची नवीन ब्रॅण्ड अँबॅसडर आहे. अनेक क्षेत्रांत यश प्राप्त केलेली मानुषी आता पृथ्वीराज या भव्य ऐतिहासिक चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.            पॅण्टीन टू-इन-वन या, शॅम्पू व नरिशिंग कंडिशनरचा दुहेरी लाभ एकाच बाटलीतून देणाऱ्या, अनोख्या उत्पादनाच्या टीव्हीसीमध्ये मानुषी झळकली आहे. मानुषीने तिच्या गळणाऱ्या शुष्क केसांचा अनुभव सर्वांना सांगितला आहे आणि आता केसांची गळती थांबल्यामुळे ते मोकळे ठेवताना किती छान वाटत आहे हेही सांगितले आहे.            केसगळती ही भारतातील तरुण स्त्रियांना मोठ्या प्रमाणात जाणवणारी समस्या आहे आणि जेव्हा केस शुष्क होतात, तेव्हा त्यांचे आणखी नुकसान होते, ते तुटू लागतात. धूळ, घाण आणि प्रदूषणासारखे मुद्दे; अनारोग्यकारक आहारासारख्या जीवनशैलीशी निगडित सवयी, अतिरिक्त ब्लो ड्रायिंग, स्टायलिंग यामुळे केस शुष्क होतात आणि केसगळती वाढते.  

  


             उपाय? केसांची काळजी घेण्यासाठी निश्चित वेळापत्रक आखणे. शॅम्पूने केस धुणे, त्यापाठोपाठ कंडिशनर लावणे, पोषक अन्नाद्वारे केसाची काळजी घेणे, पुरेसे पाणी पिणे आणि दररोज व्यायाम करणे. मात्र, आजच्या व्यग्र जीवनशैलीत अशा अनेक पायऱ्यांच्या, गुंतागुंतीच्या वेळापत्रकासाठी वेळ कोणाकडे आहे?               म्हणून सर्वांच्या मदतीला येत आहे पॅण्टीन टू-इन-वन. हे उत्पादन शॅम्पू व कंडिशनर दोन्ही एकाच बाटलीतून देते. प्रो-व्हिटॅमिन बीफाइव्ह आणि पोषक कंडिशनिंग मिश्रणाने समृद्ध असे पॅण्टीन टू-इन-वन शुष्कपणा कमी करते आणि केस मजबूत करून त्यांची गळती रोखते.            केसगळतीचा सामना आपणही केल्याचे मानुषी मान्य करते. मिस इंडिया स्पर्धेदरम्यान केलेल्या स्टायलिंगमुळे केस शुष्क पडू लागले आणि त्यानंतरच्या काही वर्षांत ते आणखी कोरडे झाले. त्यातूनच केस गळू लागले, असे ती सांगते. “मिस वर्ल्ड स्पर्धेदरम्यानची आणि त्यानंतरची वर्षे खूपच व्यग्र गेली. त्यावेळी मला खूप प्रवासही करावा लागला; सातत्याने उष्मा आणि प्रदूषणाच्या संपर्कात आल्याने माझे केस आणखी कोरडे झाले.            प्रत्येक बाबतीत शिस्त किती आवश्यक आहे हे मला त्यावेळीच लक्षात आले. एखाद्या परफॉर्मन्ससाठी तयारी करण्यापासून ते केसाची काळजी घेण्यापर्यंत प्रत्येक कामात शिस्त गरजेची आहे. तेव्हापर्यंत माझे केस अधूनमधून गळत होतेच. केसांची काळजी आतून आणि बाहेरून अशी दोन्हीकडून घ्यावी लागते. मी कटाक्षाने पोषणसमृद्ध अन्न घेऊ लागले पण केसगळती थांबवण्यासाठी उत्पादन निवडण्याची वेळ आली तेव्हा… मी नुकताच पॅण्टीन टू-इन-वन वापरून बघितला. आणि आता हा माझा समृद्ध, न गळणाऱ्या केसांसाठीचा एका टप्प्यातील उपाय झाला आहे.”            तरुण स्त्रियांमध्ये केसगळतीचा संबंध आत्मविश्वासाशी जोडला जातो, असे ग्राहक अभ्यासांतून पुढे आले आहे. पीअँडजी हेअरकेअरच्या कंट्री लीडर दीक्षा कक्कर म्हणाल्या, “मानुषी छिल्लर ब्रॅण्डचा नवीन चेहरा म्हणून लाभली याचा आम्हाला आनंद आहे. ती सर्व तरुण स्त्रियांसाठी प्रेरणेचा स्रोत आहे. पॅण्टीनच्या गुणवत्ता सिद्ध केलेल्या सोल्युशन्सच्या आधारे तिच्यासारख्या अनेक स्त्रियांना त्यांचे केस गळतीची चिंता न करता मोकळे ठेवण्यात मदत करण्याची आमची महत्त्वाकांक्षा आहे.            या विभागातील भारतामधील पहिले उत्पादन असलेले आमचे पॅण्टीन टू-इन-वन प्रो-व्हिटॅमिन बी५ आणि पोषक कंडिशनिंग मिश्रणाने समृद्ध आहे. हे दोन्ही लाभ एकाच उत्पादनाद्वारे दिले जात आहेत. यामुळे ग्राहकांना केसगळती व केसांचा शुष्कपणा या दोहोंसाठी एक श्रेष्ठ उत्पादन उपलब्ध झाले आहे. त्याचप्रमाणे अनेक पायऱ्यांमध्ये केसांची काळजी घेण्याची डोकेदुखी कमी झाली आहे.”            केसांचा शुष्कपणा व केसगळती या समस्यांनी त्रस्त असलेल्या सगळ्यांसाठी हा एकाच पायरीत केसांचे पोषण सुधारण्याचा उपाय आहे. हे उत्पादन ऑनलाइन तसेच तुमच्या जवळच्या स्थानिक दुकानांमध्ये सहज उपलब्ध आहे. 

Post a Comment

0 Comments