ओरिफ्लेम द्वारे नवी हँड आणि बॉडी लोशन श्रेणी सादर


मुंबई, ११ ऑगस्ट २०२१  : ओरिफ्लेम या आघाडीच्या सोशल सेलिंग स्वीडिश ब्युटी ब्रँडने इसेन्स अँड को. ग्रीन मंदारीयन अँड ऑरेंज ब्लॉसम हँड अँड बॉडी कलेक्शन लाँच केले आहे. यामुळे सुंदर, मोहक सुगंध आणि आधुनिक लूक मिळतो.        इसेन्स अँड कोच्या ग्रीन मंदारीयन आणि ऑरेंज ब्लॉसम हँड व बॉडी वॉश व लोशनमध्ये चकाकी असणारे ग्रीन मंदारीयन तेल आहे, जे ताजे, फळयुक्त आणि त्वचेला पुनरुज्जीवित करणाऱ्या सुगंधाने युक्त आहे. तसेच यात ऑरेंज ब्लॉसम ऑइल, हलके गोड व ताजेतवाने करणारे तेल आहे. जे ताज्या उचललेल्या पाकळ्यांपासून काढले जाते. उत्साही गुणधर्म आणि त्वचेच्या कंडिशनिंग लाभांसाठी ते ओळखले जाते. या घटकांच्या अनोख्या मिश्रणाने एक उत्साहवर्धक आणि मोहक सुगंध प्रदान केला जातो. हे सर्व सुंदररित्या अप्रतिम पॅकेजिंग डिझाइनमध्ये ठेवलेले असून त्याचे प्रदर्शन करण्याची मागणी करते.           इसेन्सअँडको. ग्रीन मंदारीयन अँड ऑरेंज हँड व बॉडी वॉश हे लक्झरीयस क्रिमी समृद्ध लेदरसह आहे. यामुळे त्वचा मऊ आणि हलकीशी सुगंधी बनते. तर दुसरीकडे, हायड्रेटिंग इसेन्सअँडको ग्रीन मंदारीयन अँड ऑरेंज हँड व बॉडी लोशनमध्ये नैसर्गिक आवश्यक तेलांचे मिश्रण आहे. ते त्वचेत तत्काळ शोषले जाते आणि हात तसेच शरीर स्पर्शासाठी मऊ बनते. तसेच त्यास ताजा सुगंध येतो.

 


      ओरिफ्लेमचे प्रवक्ते म्हणाले, “इसेन्सअँडको. ग्रीन मंदारीयन अँड ऑरेंज ब्लॉसम हँड व बॉडी लोश तसेच वॉशमध्ये आवश्यक तेलांचे मिश्रण असून यामुळे त्वचा आनंददायी, मऊ आणि सुगंधी होते. या दैवी मिश्रणासह, आम्ही या कलेक्शनच्या पॅकेजिंगवरील सौंदर्यावरही लक्ष केंद्रित केले आहे. त्वचाशास्त्राकडून तपासलेले, पीएच संतुलित असलेले फॉर्म्युलेशन तुमच्या त्वचेला अप्रतिम बनवते. तसेच हे आधुनिक डिझाइन कोणत्याही सेल्फवर शोभून दिसेल.”

Post a Comment

0 Comments