केडीएमसीच्या लसीकरण केंद्रावर दोन तरुणीचा राडा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पश्चिमेकडील होली क्रॉस शाळेतील लसीकरण केंद्रावर  आज दोन तरुणीचा वाद झाला. या दोन्ही तरुणी रांगेत उभ्या होत्या. नंबर वरून या दोघीमध्ये वाद झाल्याची माहिती लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्यांवर दिली. या वादाचे पर्यावसान काही क्षणातच हाणामारी मध्ये झालं. लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत हे भांडण सोडवलं. या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.केडीएमसीच्या वैद्यकीय विभागाने कल्याण पश्चिमेकडे असलेल्या रामबाग परिसरातील हॉली क्रॉस शाळेत कोव्हीड प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू केले आहे. लसींचा साठा मर्यादित स्वरूपात येत असल्याने लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांचा हिरमोड होत असतो. पहाटेपासून रांगेत उभे राहूनही लस मिळत नसल्याने केंद्रांवर तेथिल कर्मचारी आणि नागरिकांमध्ये भांडणे होत असतात. असाच प्रकार कल्याणच्या हॉली क्रॉस लसीकरण केंद्रावर घडला.या केंद्रात लस घेण्यासाठी दोन तरुणी रांगेत उभ्या होत्या. नंबरवरून या दोघीमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यावसान काही क्षणातच हाणामारीमध्ये झाले. लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत हे भांडण सोडवले. मात्र या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असला तरी ही घटना आज सकाळी घडली असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. या दोन्ही तरुणींची नावे कळू शकलेली नाहीत.


Post a Comment

0 Comments