धारावी व विक्रोळी येथे २१६ निरंकारी भक्तांचे उत्साहपूर्ण रक्तदान


 कल्याण , कुणाल म्हात्रे : रक्त नाड्यांमध्ये वाहावेनाल्यांमध्ये नको’ या सद्गुरुंच्या पावन शिकवणूकीचा अंगिकार करत संत निरंकारी मिशन मार्फत धारावी व विक्रोळी येथे आयोजित दोन रक्तदान शिबिरांमध्ये २१६ निरंकारी भक्तांनी उत्साहपूर्ण रक्तदान केले.


      संत निरंकारी मिशनकडून कोरोना महामारीच्या कालखंडामध्ये मागील एक वर्षाहून अधिक काळ चालविण्यात येत असलेली रक्तदान शिबिरांची श्रृंखला पुढे घेऊन जात असताना रविवारी  २९ ऑगस्ट रोजी संत कक्कय्या म्युनिसिपल स्कूल, धारावी येथे आयोजित शिबिरामध्ये १२८ निरंकारी भक्तांनी रक्तदान केले तर २२ ऑगस्ट रोजी विक्रोळी पार्क साईट येथील संत निरंकारी सत्संग भवनामध्ये आयोजित शिबिरामध्ये ८८ निरंकारी भक्तांनी रक्तदान केले. दोन्ही शिबिरांमध्ये रक्त संकलनाचे कार्य संत निरंकारी रक्तपेढीकडून पार पाडण्यात आले.      धारावीच्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मंडळाचे सेक्टर संयोजक बाबुभाई पांचाळ यांनी केले. त्यांच्या समवेत सेवादल क्षेत्रीय संचालक शंकर सोनावने हेही उपस्थित होते. या शिबिराला सदिच्छा भेट देणाऱ्या मान्यवरांमध्ये हर्षला मोरेरामदास कांबळे, दीपक काळेवकील शेखराजेश कुमारगजानन पाटीलगंगा डेरबेनराजू कुंचिकोरवे आणि मंजुळा श्रेणी यांचा समावेश होता.      विक्रोळीच्या शिबिराचे उद्घाटन सेवादल क्षेत्रीय संचालक ललीत दळवी यांच्याहस्ते करण्यात आले. या शिबिराला ज्योती हारुण खान आणि हारुण खान या मान्यवर व्यक्तींनी सदिच्छा भेट दिली. दोन्ही शिबिरांचे आयोजन मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक आणि मुखी यांनी स्थानिक सेवादल युनिट व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या सहकार्याने केले.

Post a Comment

0 Comments