ब्रह्मांड कट्टयावर स्त्री पौरोहित्याचे उलगडले विश्व

 

 ठाणे , प्रतिनिधी  :  ब्रह्मांड कट्टयावर  पौरोहित्य या क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्त्रियांची मुलाखत आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जेष्ठ पुरोहिता अंजली काळे, त्याच्या कन्या व शिष्या क्षमाताई जोगळेकर व क्षमाताईच्या शिष्या आरती भागवत  सहभागी झाल्या होत्या. यांच्याशी सुसंवाद  साधला कट्ट्याच्या सचिव सौ.स्नेहल जोशी यानी .सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरूवातीस संस्थापक  राजेश जाधव यांनी कार्यक्रमाची संकल्पना सादर केली.   


 

            सुरूवातीला या स्त्री पुरोहीतानी छानसा श्लोक सादर केला . अंजली काळे या ८५ वर्षाच्या असून त्यांनी पौरोहित्य  शिकण्यास सुरूवात वयाच्या ५० व्या वर्षी  केली .पाठातंरासाठी  वयाचे कोणतेही बधंन नसल्याचे आर्वजून उल्लेख केला पाठातंरामुळे  बुध्दी अतिशय तल्लख  होत असल्याचे  तसेच मन अतिशय प्रसन्न रहात असल्याचा फायदा सांगितला. तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्वतंत्रपणे पौरोहित्य करण्यास सुरूवात केली. पौरोहित्य करताना कधीही  अडचण आली नाही.              पुरूष पौरोहित्य यांनी  वेळोवेळी सहकार्य करत असल्याचा सांगितले. खास करून रायगड जिल्ह्य़ातील उरण तालुक्यातील एका छोट्या गावात मंदिराचे जीर्णोद्धार प्रसंगी आलेला अनुभव सांगितला.  आत्ता काही घरातील प्रत्येक कार्यासाठी नियमित पुरोहीत म्हणून जातात. त्यांच्या ८५ व्या वर्षातील फिटनेस चे रहस्य विचारले असता त्यांनी थ्रो बाॅल खेळत असल्याचे सांगितले.व मैदानी खेळात देखील प्राविण्य असल्याचे नमूद करत पौरोहित्य देखील प्राविण्य असल्याचे विषद केले.याबाबत विविध अनुभव सांगितले.            आत्तापर्यंत विविध पुरस्कार व विविध  वृत्तपत्रातून कार्याची दखल घेतली. त्यांनी रुद्राणी मडंळाची स्थापना केली. त्या माध्यमातून आत्तापर्यंत २५० च्या वर  शिष्या घडविण्याल्या व आज छान पणे त्या कार्य करीत असल्याचा अभिमान असल्याचे विषद केले. यासाठी घरातून पाठिंबा मिळाल्याच्या आर्वजून उल्लेख केला . क्षमाताई या एल आय सी मध्ये नोकरी करीत असून घरची जबाबदारी साभांळून  पौरोहित्य शिकण्यास सुरूवात केली व आईकडे शिकल्या. शिक्षण घेत असताना कधीही लेक म्हणून कधीही सवलत मिळाली नाही.            क्षमाताई यांनी   बी ए एससी सायन्स मध्ये शिक्षण पुर्ण केले असून गणित या विषयाची आवड असल्याने मंत्र पाठातंरासाठी कोणतीही अडचण आली नाही. पुरोहित म्हणून कार्य  करीत असतात.  या दरम्यान  विविध अनुभव विषद केले. हे कार्य करीत असताना विविध स्पर्धेत भाग घेत प्रथम क्रमांक  मिळविला आहे. तर संस्कार भारती रांगोळी शिकल्या व विविध ठिकाणी कार्यक्रमासाठी तसेच पंचतारांकित हाॅटेल्समध्ये खाद्य महोत्सव साठी संस्कार भारती रांगोळी काढण्याचे काम केले.         अशा विविध स्पर्धा, पौरोहित्य व नोकरी यासाठी वेळेचे नियोजन करण्यात घरून पाठींबा मिळालाच पण एल आय सी कार्यालयातून देखील पाठिंबा असल्याचा आर्वजून उल्लेख केला.  तर आरती भागवत यांना  पौरोहित्य ची कोणतीही पार्श्वभूमी नसल्याचे नमुद केले याची आवड असल्याने व  घरातून पाठिंबा मिळाल्याने या क्षेत्रात आल्याचे सागंत गुरू क्षमाताई यांचेमुळे एक वेगळा आत्मविश्वास व  अनुभव मिळत असल्याचे सांगितले.              रूद्राणी मडंळातर्फे आत्ता पर्यत विविध सामाजिक कार्यात सहभाग नोंदविला आहे. कार्यक्रमाची सागंता सुंदरशा श्लोकानी झाली.  आभार प्रदर्शन अध्यक्ष महेश जोशी यांनी केले.

Post a Comment

0 Comments