भुजबळांनी भटके विमुक्तांना मोफत अन्न धान्य पुरवठा केला तर येवल्याचा विकास झाला समजू


■भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांची भुजबळांवर टीका....


कल्याण : स्वतःला विकास पुरुष समजणार्या छगन भुजबळांनी गरिब भटके विमुक्तांना मोफत अन्न धान्य पुरविले तर आम्ही येवल्याचा विकास झाला असं समजू अशी टीका भाजपाचे माजी आमदार व भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांनी केली.पाच दिवसीय उत्तर महाराष्ट्र विभागीय दौऱ्यादरम्यान आज नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात त्यांचे आगमन झाले त्यावेळी पवार यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांवर निशाणा साधला. अनेक गरीबकामगार व पीडितांना रेशनचे मोफत धान्य मिळत नसून अनेक ठिकाणी घोटाळे होत आहे पण शासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नरेंद्र पवार यांनी सांगितले.नरेंद्र पवार यांचे येवला शहारामध्ये कार्यकर्तेपदाधिकारी व समाज बांधवांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दौऱ्यास सुरुवात करण्यात आली. उपस्थित सर्व पदाधिकारी व समाज बांधवांसोबत पवार यांनी संवाद साधला तसेच येवल्याचे विकास पुरुष म्हणवणाऱ्या भुजबळांनी येवला वासीयांना व विशेषतः भटके विमुक्त समाजाला मोफत अन्न धान्य पुरवठा केला तरी येवला तालुक्याचा विकास झाल्याचे समजले जाईल असे संबोधून भुजबळांच्या विकासाच्या गोष्टींना उत्तर दिले.

Post a Comment

0 Comments