Header AD

‘मेक इन इंडिया’ व्हिडिओ कम्युनिकेशन अॅप ‘वयम्' लॉन्चगूगल आणि झूमसारख्या पाश्चिमात्य अॅपना मिळणार भारतीय पर्याय ~


मुंबई, १३ ऑगस्ट २०२१ : बी२बी टेक आधारीत प्रगत व्हिडिओ कम्युनिकेशन्स स्टार्टअप सुपरप्रोने ‘वयम्’ हे भारताचे नवीन व्हिडिओ कम्युनिकेशन अॅप लाँच करून बी२सी क्षेत्रात प्रवेश केला आहे. ‘मेक इन इंडिया’ प्रतिज्ञेला प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवत, भारतीय वापरकर्त्यांच्या सांस्कृतिक भावनांना नावीन्यपूर्ण आणि उत्साही सुविधांसह वाव देण्याचा प्रयत्न करेल. भारतीय वापरकर्त्यांची श्रद्धा आणि देशाच्या सार्वभौमत्वाला मान देणाऱ्या पहिल्या देशांतर्गत प्लॅटफॉर्मपैकी हे एक असेल. यामुळे भारतीय बाजारपेठेत गूगल, झूमसारख्या पाश्चिमात्य अॅपचे दुहेरी वर्चस्व दूर होईल.        जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ असूनही भारतीय अॅप सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या टॉप १० व्हिडिओ कम्युनिकेशन अॅपमध्ये समाविष्ट नाहीत. कारण बाजारात विदेशी अॅपचे वर्चस्व आहे. परिणामी देशाची सुरक्षितता आणि यूझर्सच्या डेटाला जास्त धोका निर्माण होऊ शकतो.      सत्संग, आरती, पूजा, कीर्तन इत्यादी विविध भारतीय संकल्पनांनुसार व्हर्चुअल रुम डिझाइन करण्याच्या क्षमतेसह, ‘वयम्’ हे मेड इन इंडिया अॅप भारतीय यूझर्सना एक आभासी अनुभव देण्यासाठी तयार करण्यात आले आहे. महामारीमुळे लोकांना एकत्र येण्याची तसेच सण साजरे करण्याची क्षमता मर्यादित झाली आहे. त्यांच्या परंपरा साजऱ्या करण्यासाठी व्हिडिओ कम्युनिकेशन्स टूल्स हे सहज उपाय प्रदान करतात. याच प्रक्रियेला अधिक सक्षम करण्यासाठी ‘वयम्’ प्रत्येक प्रसंगासाठी यूजर्सना रिअल लाइफ अनुभव देण्याकरिता एक विशेष व्हर्चुअल रुम तयार करेल.       आतापर्यंत वयम् ने संघ समूहासाठी गुरुपौर्णिमा उत्सव, रूट्स२ रूट्स या सांस्कृतिक आदान-प्रदान कार्यक्रमांवर भर असणारी स्वयंसेवी संस्थेकरिता आणि रामायण-गीता कथा कार्यक्रमांसह ब्रह्मकुमारींसाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. आयआयटीमधील उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी पाठिंबा दिलेले ‘वयम्’, हे वर्धिक वैशिष्ट्यांसह, यूझर्सना विश्वासार्ह, सुरक्षित आणि वापरण्यास सोपे, ‘मेड इन इंडिया’ असे व्हिडिओ कम्युनिकेशन समाधान आहे.      सुपरप्रो.एआयचे संस्थापक आणि सीईओ श्री गौरव त्रिपाठी म्हणाले, “भारतातील व्हिडिओ कम्युनिकेशन मार्केटमध्ये गूगल आणि झूमसारख्या पाश्चिमात्य अॅपचे मोठ्या प्रमाणावर वर्चस्व आहे. ‘गो व्होकल फॉर लोकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ वर अधिक भर देत, भारतीय यूझर्सना अधिक अनुभव देण्याचा तसेच देशातील समृद्ध व विविधतेच्या संस्कृतीचे आवाहन करण्याचा ‘वयम्’ चा उद्देश आहे. वयम् चा भारतात प्रथमच असण्याचा दृष्टीकोन समोर ठेवत, यूझर्सना सांस्कृतिकदृष्ट्या जोडण्याचा वैशिष्ट्यपूर्ण अनुभव देईल, असा आम्हाला विश्वास आहे.”

‘मेक इन इंडिया’ व्हिडिओ कम्युनिकेशन अॅप ‘वयम्' लॉन्च ‘मेक इन इंडिया’ व्हिडिओ कम्युनिकेशन अॅप ‘वयम्' लॉन्च Reviewed by News1 Marathi on August 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक, व्यवस्थापन यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या लसीकरण याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अन्यथा नियमानुसार कारवाई करणार ...आयुक्त सुधाकर देशमुख

भिवंडी , प्रतिनिधी  :  भारत सरकार, महाराष्ट्र राज्य कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्याकरता सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. याकरिता महानग...

Post AD

home ads