दहीहंडी सण साजरा करण्यासाठी राज्य सरकारची आडकाठी - आ.रवींद्र चव्हाण
डोंबिवली ( शंकर जाधव ) हिंदू सण आणि संस्कृती जपण्याचे कार्य राज्यसरकारने केले पाहिजे.परंतु  दहीहंडी सण साजरा करण्यासाठी राज्य सरकार निर्बंध आडकाठी  आणत असल्याची टिका  माजी मंत्री आणि आ.रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीतील एका कार्यक्रमात केली आहे. जेष्ठ नगरसेवक स्व.शिवाजी शेलार यांच्या जयंतीनिमित्त खंबालपाडा येथे स्मारक निर्माण करण्यात आले आहे.             या स्मारकाचे उदघाटन आ.चव्हाण यांच्या हस्ते झाले.यावेळी माजी नगरसेविका शिल्पा शेलार, नगरसेवक साई शेलार, गंगाराम शेलार, सिध्दार्थ शेलार, शशिकांत कांबळे,
राजू शेख , विनोद काळण, निलेश म्हात्रे, मुकुंद पेंढणेकर,
मितेश पेणकर इत्यादी मान्यवर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.              यावेळी पत्रकारांशी बोलताना आ.रवींद्र चव्हाण म्हणाले, दहीहंडी हा सण हिंदू संस्कृती जपणरा आहे.दहिहंडी साजरी करताना निर्बंध जरुर टाकावे परंतु आडकाठी आणू नये.

Post a Comment

0 Comments