मतदानाचा हक्क आहे,लस देण्यास उशीर का लसीकरण मोहिमेत तृतीयपंथींचा सरकारला थेट सवाल


 डोंबिवली ( शंकर जाधव ) करोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकांचे लसी होणे आवश्यक आहे.राज्य सरकारने यासाठी करोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात केली.मात्र समाजातील काही घटनांकडे सरकारने लक्ष दिले नसल्याने या घटकांनी नाराजी व्यक्त केली. 
       तृतीयपंथींना मतदानाचा हक्क दिला मात्र लस देण्यास सरकारने का उशीर केला असा थेट सवाल लसीकरण मोहिमेत तृतीयपंथींनी केला. डोंबिवलीत तृतीयपंथीय  आणि वारांगणा व्यक्तींसाठी शहरातील पहिल्या कोविड-१९ लसीकरण मोहिमेचे आयोजन केले होते.
   वंचित तसेच ज्यांच्यापर्यंत पोहोचणे कठीण आहेअशा समाज गटांतील व्यक्तींच्याही लसीकरणाची सोय व्हावी याची काळजी घेण्यासाठी रोटरी क्लब आँफ डोंबिवली वेस्ट च्या वतीने  आप्टीलाईफ हास्पीटल येथे  ही मोहीम राबविण्यात आली. जास्तीत-जास्त लोकांपर्यंत लसीकरणाची माहिती पोहोचावीत्यांचे कोविड-१९ पासून संरक्षण व्हाव या हेतूने १००  तृतीयपंथीय आणि वारांगणाचे लसीकरण करण्यात आले.

         ग्लोबल राईट फाउंडेशनच्या सभासदांना याचा लाभ घेता आला. कोणताही समाजगट या आवश्यक सेवांपासून वंचित राहू नये.लसीकरणामुळे या समाजघटकाला सुरक्षितता मिळु शकते. आरोग्यसेवा मिळणे हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. व्यापक पातळीवर समाजापर्यंत पोहोचून लोकांना कोविड-१९  च्याविरोधात आवश्यक ती सुरक्षा बहाल करणे हे आमचे उद्दीष्ट आहे.
       कोविड-१९ विरोधातील लसीकरण हे सार्वजनिक आरोग्यासमोर उभ्या राहिलेल्या या संकटातून बाहेर येण्यासाठी उचललेले पहिले पाउल आहे.असे रोटरी इंटरनँशनलचे माजी संचालक रो.अशोक महाजन यांनी यावेळी सांगितले.तर डिस्ट्रिक्ट कोवीड १९ टास्क फोर्स प्रमुख डॉ.मोहन चंदावरकर म्हणाले कि७० टक्के समाजाचे लसीकरण झाले तरच सुरक्षितता प्राप्त होउ शकते. 
          या उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल डॉ. मयुरेश वारकेरोटरी क्लब आँफ डोंबिवली वेस्टचे अध्यक्ष विरेंद्र पाटील डोंबिवली वेस्टचे सदस्यरोटरँक्ट क्लब आँफ के.वी.पेंढारकर काँलेजरोटरी कम्युनिटी काँर्पस आँफ बाले वाकलणआँप्टीलाईफ यांचे विशेष सहकार्य लाभले.ग्लोबल राईट फाउंडेशनच्या महकदीदी  यांनी लसीकरण मोहिम राबविण्यात आल्याबद्दल रोटरीचे आभार मानले. 
     तृतीयपंथींच्या ह्क्क्कासाठी काम करत असलेल्या ग्रोबल राईट फाउंडेशनच्या सदस्या सिद्धी चौधरी म्हणाल्या,मतदान करतो खूप दिवसानंतर लस मिळाली, आम्ही कोणाला दोष देणार देऊन? सरकारने आमच्याकडे  समाज दुर्लक्ष करू नये सरकारने असे सांगितले.तर एका वारांगणाने लॉकडून मध्ये सरकारने आमच्याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप केला.

Post a Comment

0 Comments