शिवसेनेचे केंद्रीय मंत्री नारायण राणें विरोधात डोंबिवलीत कोंबड्या उडवून आंदोलन


 डोंबिवली ( शंकर जाधव ) केंद्रीय राज्यमंत्री नारायण राणे यांचे मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातील वक्तव्य केल्याने राज्यभर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. डोंबिवलीत नारायण राणेंच्या विरोधात इंदिरा चौकात आंदोलन केले.यावेळी शिवसैनिकांनी चौकात नारायण राणेंच्या पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला, तर कोंबड्या उडवून आंदोलन करून राणेंविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.  
   आंदोलनात डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. कल्याण उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळशहरप्रमुख राजेश मोरेराजेश कदमयुवा सेना पदाधिकारी राहुल म्हात्रेसागर जेधेसागर दुबे,अभिजित थरवळसंजय पावशेपंढरीनाथ पाटील,प्रथमेश खरात  महिला आघाडी वैशाली दरेकरमंगला सुळे, किरण मोंडकर आदीं सह शेकडो महिला पुरुष शिवसैनिक  आंदोलनात सहभागी होते. 

         केंद्रीय अवजड उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत सोमवारी आक्षेर्पाह वक्तव्य केले.त्या विरोधात शिवसेनेने मंगळवारी इंदिरा चौकात घोषणाबाजी करीत राणे यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. नारायण राणे `कोंबडी चोर` म्हणत सैनिकांनी पोत्यातून कोंबड्या काढून चौकात भिरकावून देत `कोंबडी चोर, कोंबडी चोर`चौक दणाणून सोडला. आंदोलनात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.    

     या आंदोलनात नारायण राणेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.कोंबड्या हवेत उडवून यावेळी शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला.आंदोलनानंतर शिवसैनिकांनी रामनगर पोलीस ठाण्यात    नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी सहायक पोलीस आयुक्त जय मोरे यांच्याकडे निवेदन दिले. 

     डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. कल्याण उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळशहरप्रमुख राजेश मोरे,राजेश कदमयुवा सेना पदाधिकारी राहुल म्हात्रेसागर जेधेअभिजित थरवळसंजय पावशेपंढरीनाथ पाटीलमहिला आघाडी वैशाली दरेकरमंगला सुळे, विवेक खामकर, संतोष चव्हाण आदीं सह शेकडो महिला पुरुष शिवसैनिक  आंदोलनात सहभागी होते.

Post a Comment

0 Comments